सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जातं. सोशल मीडियावर दररोज नवनवीन अतरंगी व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. हत्ती हा पृथ्वीवरील सर्वात वजनदार प्राण्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. हत्तीचं वजन हे सरासरी पाच ते सहा हजार किलो इतकं असतं. त्यामुळे इतक्या वजनदार प्राण्याला एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवणं काही सोपं काम नाही. त्यासाठी प्रचंड शक्तिची गरज भासेल. हत्ती हा जगातील सर्वात बुद्धिमान प्राण्यांपैकी एक आहे आणि वेळोवेळी ते पहायलाही मिळतं. आतापर्यंत हत्तीच्या कृतीने नेहमीच अनेक लोकांची मनं जिंकली आहेत. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, महाकाय हत्ती एका खड्ड्यात अडकला आहे. या व्हिडीओमध्ये आजूबाजूला खूप चिखल दिसत आहे. हत्तीला खड्ड्याबाहेर काढण्यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत. हत्तीला बाहेर काढण्यासाठी लोकांना जेसीबीसुद्धा मागवला असून जेसीबीच्या सहाय्याने हत्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातोय, अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर हत्तीला बाहेर काढण्यात यश येत. दरम्यान हत्ती बाहेर आल्यानंतर त्याने केलेल्या एका कृतीचं सोशल मीडियावर प्रचंड कौतुक होतंय. हत्तीनं आपल्याला बाहेर काढणाऱ्या जेसीबी ड्रायव्हरचं चक्क आभार मानले आहेत. यावेळी हत्ती भावनीक झाल्याचं पाहायला मिळतंय. माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही भावना असतात हे पुन्हा एदा सिद्ध झालं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Video: एस्कलेटवर भीषण अपघात; पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे उलटे कोसळले लोक, पाहून तुमचाही उडेल थरकाप

व्हिडीओवर खूप साऱ्या कमेंट येत असून लोक पुन्हा एकदा माणुसकीचं दर्शन झाल्याचं म्हणत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर कायमच प्राण्यांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये खूप कमी व्हिडीओ लोकांचे मन जिंकतात. असे माणुसकीचं दर्शन घडवणारे व्हिडीओ नेहमी लोकांच्या पसंतीस उतरतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elephant got stuck in a pit people saved its life using jcb video viral on social media srk