बापरे! विमानाने उड्डाण घेतलं अन् १३ तासांनी त्याच ठिकाणी उतरलं, आकाशात नेमकं काय घडलं? | emirates flight airplane landing on same airport after 13 hours travelling in the sky know the reason what happens at Auckland Airport nss 91 | Loksatta

बापरे! विमानाने उड्डाण घेतलं अन् १३ तासांनी त्याच ठिकाणी उतरलं, आकाशात नेमकं काय घडलं?

दुबईहून न्यूझीलंडला निघालेलं विमान १३ तासानंतर पुन्हा दुबईतच उतरलं, कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क.

Emirates flight Viral News On Internet
एमिरेट्स फ्लाईटची घटना झाली व्हायरल. (Image-The Indian Express)

Emirates Flight Viral News : गेल्या काही दिवसांपासून विमान प्रवासातील धक्कादायक घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत. कधी विमान कंपनीचा गैरकारभार समोर येतो, तर कधी प्रवाशांमध्ये झालेले वादविवादाचे व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होतात. आताही विमान प्रवासातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर आकाशात १३ तासांच्या प्रवासानंतर त्याच ठिकाणी विमानाने लॅंडिंग केलं. गेल्या शुक्रवारी दुबईहून न्यूझीलंडला एमिरेट्स फ्लाईटने उड्डाण केले होते. विमानाने आकाशात उड्डाण घेतल्यापासून १३ तासांहून अधिक वेळ आकाशात प्रवास केलं. परंतु, एका असामान्य घटनेमुळं आकाशात उड्डाण केलेलं विमान टेकऑफ केलेल्या ठिकाणीच उतरलं. फ्लाईट ईके 448 ने स्थानिक वेळेनुसार, शुक्रवारी सकाळी साडे दहा वाजाताच्या सुमारा उड्डाण घेतली होती.

फ्लाईटअवेयरने दिलेल्या माहितीनुसार, पायलटने जवळपास ९००० मील एवढा प्रवास केल्यानंतर अर्ध्या मार्गावरूनच यू-टर्न घेतला. विमान शुक्रवार किंवा शनिवारी मध्यरात्री पुन्हा दुबईत उतरलं. न्यूझीलंडच्या ऑकलॅंड शहरात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे वीकएंडला तेथील विमानतळ बंद करण्यात आलं होतं. ऑकलॅंड विमानतळावरील अधिकाऱ्यांनी ट्वीटरवर म्हटलं की, “हे खूप निराशाजनक आहे. पण प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून महत्वाचं निर्णय घेणे आवश्यक आहे. ऑकलॅंड विमानतळ कंपनीकडून आंतरराष्ट्रीय टर्मिनलची नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचं समजते आहे. या विमानतळावर कोणतीही विमाने उतरवण्यात येणार नाहीत, असं सांगण्यात आलं. आम्हाला माहितेय हे खूप निराशाजनक आहे. पण प्रवाशांना सुरक्षित ठेवणे, हे आमचं पहिलं कर्तव्य आहे.

नक्की वाचा – बापरे! रुग्णाची शस्त्रक्रीया सुरु असतानाच डॉक्टरांमध्ये जुंपली, ऑपरेशन थिएटरचा Video पाहून धडकीच भरेल

इथे पाहा व्हिडीओ

“बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, ऑकलॅंडमध्ये शुक्रवारी जोरदार पावसाची नोंद झाली. न्यूझीलंडच्या सर्वात मोठ्या शहरात नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहनं करण्यात आलं आहे. या आठवड्यातही मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळं चार जणांचा मृत्यू झाला. पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या लोकांना बचाव पथकाकडून बाहेर काढण्यात येत असल्याचं कळते आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 31-01-2023 at 11:39 IST
Next Story
हत्तीने रस्ता कसा ओलांडायचा ते पिल्लाला कसे शिकवले पाहा; Viral Video ने जिंकली नेटकऱ्यांची मनं