लग्नसोहळा म्हटलं की धम्माल आलीच. मग नवरीकडचे नातेवाईक असो किंवा नवऱ्याकडचे नातेवाईक सर्वजण धम्माल करताना दिसतात. अशामध्ये या लग्नसोहळ्यात सर्वात जास्त मजा-मस्ती करतात ते म्हणजे नवरदेवाचे मित्र. पण सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मित्रांऐवजी स्वतः नवरदेवच एन्जॉय करताना दिसून येतोय. नवरीला सरप्राईज देण्याच्या नादात या नवरदेवाने जे केलं ते पाहून लग्नमंडपातील सर्व वऱ्हाडी मंडळी पाहतच राहिले. हा व्हिडीओ सध्या फारच चर्चेत आलाय. लोक हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर करताना दिसून येत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विवाह सोहळा हटके करण्याकडे अनेकांचा कल असतो. लग्नाच्या दिवशी नवरी नवरदेव एकमेकांना सरप्राईज देण्याचा प्रयत्न करत असतात. कुणी सरप्राईज डान्स करतं तर कुणी सरप्राईज गिफ्ट देऊन हा दिवस अविस्मरणीय करतं. पण या व्हायरल व्हिडीओमध्ये नवरदेवाने आपल्या नवरीला ज्या पद्धतीने सरप्राईज केलंय, ते पाहून सारेच जण अवाक झाले आहेत. या व्हायरल व्हिडीओमधला नवरदेव चांगलाच चर्चेत आलाय.

आणखी वाचा : इवल्याश्या कासवांनी या VIRAL VIDEO तून दिला आयुष्यातला सर्वात मोठा धडा


व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की स्टेजवर नवरी-नवरदेवासोबत अनेक लोक उपस्थित आहेत. अचानक नवरीला पाहून नवरदेव उत्साही होतो आणि धमाकेदार स्टाईलमध्ये नाचू लागतो. इतकंच नाही तर नाचत असताना हा नवरदेव अचानक नवरीवर पैसे उडवायला सुरू करतो, हे पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात आणि टाळ्या वाजवू लागतात. संपूर्ण लग्नमंडपात शिट्ट्यांचा आवाज घुमू लागतो.

आणखी वाचा : किली पॉल आणि बहीण नीमा यांच्यावर सुद्धा अली जफरच्या ‘झूम’ची नशा, नवीन VIRAL VIDEO पाहिला का?

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : बापरे! चालकाशिवायच धावू लागली रिक्षा; VIRAL VIDEO पाहून लोक आश्चर्यचकित

नवरदेवाचा हा परफॉर्मन्स पाहून लोक सुद्धा आश्चर्यचकित झाले आहेत. लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेताना दिसून येत आहेत. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ ‘amit_kumar_chaurasiya333’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. या व्हिडीओला एक लाख २५ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केलं आहे. लोक या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील देत आहेत. काही म्हणतात, “रब ने बना दी जोडी”. तर कोणी म्हणतो की, “नवरीला खुश करण्यासाठी भावाने सर्वस्व लुटले.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funny video groom amazing performance infront of bride watch viral video prp