ज्यांना थरार अनुभवायला आवडतो अशा पर्यटकांसाठी चीनमधले काचेचे पूल सर्वात आवडते ठिकाण आहेत. त्यातून काही पर्यटकांची चीनमधल्या हुबेनी प्रांतात असलेल्या तायहँग पूलाला विशेष प्रसिद्ध आहे. जमिनीपासून तीन हजार आठशे फूट उंच दोन डोंगरांना जोडणारा हा पूल पूर्णपणे काचेचा बांधण्यात आला आहे. पूल काचेचा असल्याने पर्यटकांना या पूलावरून चालताना धडकी भरते, पण तरीही चीनमधलेच नव्हे, तर अनेक विदेशी साहसी पर्यटक थरार अनुभवण्यासाठी येथे येतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डव्हच्या ‘त्या’ वादग्रस्त जाहिरातीतली कृष्णवर्णीय मॉडेल म्हणते..

पण गेल्या दोन दिवसांपासून या पूलावर पर्यटकांसोबत जे प्रँक केले जात आहे त्यामुळे हा पूल चर्चेत आला आहे. आधीच जीव मुठीत घेऊन केवळ थरार अनुभवण्यासाठी काही पर्यटक या पुलावर येतात. त्यातून लोकांचं पर्यटन अधिक थरारक करण्यासाठी येथे प्रँक सुरू करण्यात आले आहेत. एखादा पर्यटक पुलावरून चालू लागला की आवाज होऊन पुलाला तडे जातात. पायाखाली तडे गेल्याचं पाहून पर्यटक जीव मुठीत घेऊन देवाचा धावा करतात, पण नंतर मात्र ही केवळ गंमत असल्याचं त्यांना सांगण्यात येतं.

या गंमतीमुळे काही पर्यटक तर पुलावरून चालण्याऐवजी गुडघ्यावर रांगत पलीकडे गेल्याचं पाहायला मिळत आहे. या प्रँकचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, पर्यटकांना प्रँकमुळे घाबरलेलं पाहून इतर लोकांना जरी मज्जा वाटत असली तरी यामुळे त्या लोकांचा जीव जवळजवळ जायचीच वेळ आली असणार हे नक्की!

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funny video of china cracking bridge prank