फक्त २ आठवडे राहिलेत
दास रामाचा वाट पाहे – सजणा
असं आत्मविश्वासाने म्हणणाऱ्यांना आरतीची पुस्तकं नक्की द्या!
एवढंच नाही तर, “फळीवर वंदना” आहे तिलाही खाली उतरवली पाहिजे!
आणि हो, ‘दिपक जोशी नमोस्तुते’वाल्यांना वर्षभर सवलतीच्या दरात शुभंकरोती पण द्या..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या चार-पाच ओळी काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाल्या आणि मग पुढे त्याची अनेक आवर्तनं निघाली. गणपतीच्या आरत्या म्हणताना होणा-या ठळक चुका आणि त्या न सुधारता आत्मविश्वासाने चुकीची परंपरा पुढे सुरू ठेवणा-यांच्या विरोधात यंदा काही लोकांनी चांगलीच आघाडी उघडलेली पाहायला मिळते आहे. पण यातली महत्त्वाची बाब म्हणजे हा आक्षेप टोकाचा नसून अतिशय विनोदी आणि उपहासात्मक अंगाने यावर चर्चा सुरू आहे. या चूका नेमक्या काय आहेत आणि योग्य शब्द कोणते आहेत, याचा घेतलेला आढावा.

चूक – *ओटी शेंदुराची
बरोबर – उटी शेंदुराची
—–
चूक – *संकष्टी पावावे
बरोबर – संकटी पावावे
—–
चूक – वक्रतुंड *त्रिमेना
बरोबर – वक्रतुंड त्रिनयना
—–
चूक – दास रामाचा वाट पाहे *सजणा
बरोबर – दास रामाचा वाट पाहे सदना
—–
चूक – *लवलवती विक्राळा
बरोबर – लवथवती विक्राळा
—–
चूक – ओवाळू आरत्या *सुरवंट्या* येति
बरोबर – ओवाळू आरत्या कुरवंड्या येति
——
चूक – लंबोदर पितांबर *फळीवर वंदना*
बरोबर – लंबोदर पितांबर फणिवर वंदना

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganesh prayers what is right and what is wrong