दिवसभर कार्यालयात वा उद्योगधंद्यात काम करुन सायंकाळी अनेकांची बुद्धी सुस्तावत असेल. पण तुम्ही कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेऊ नका. कारण आम्ही तुमच्या बुद्धीला पुन्हा चालना मिळण्यासाठी ऑप्टीकल इल्यूजनचा एक जबरदस्त फोटो शेअर केला आहे. हा साधारण फोटो नाहीय. या फोटोत कुत्रा, मांजर नाही तर बिबट्या लपला आहे. एरव्ही मानवी वस्तीत घुसणारा बिबट्या आपण पाहिला असेल. पण आता या फोटोत लपलेला बिबट्या तुम्हाला शोधायचा आहे. या फोटोत असलेला बिबट्या शोधणं इतकं सोपं नाही पण अशक्यही नाही. कारण तुम्हाला बिबट्या शोधण्यासाठी तीक्ष्ण नजरेने हा फोटो पाहावा लागेल. यासाठी तुम्हाला १० सेकंदांची वेळ दिली जाईल.
…. तर बिबट्याला तुम्ही शोधू शकता
ऑप्टीकल इल्यूजनच्या या फोटोत एका झाडाचा खोड आणि मातीचा भरावा दिसतो. पण या फोटोत कुठंतरी बिबट्याही लपलेला आहे. पण हा बिबट्या शोधण्यासाठी तुम्हाला गरुडासारख्या नजरेने हा फोटो पाहावा लागेल. फोटोत लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्यासाठी तुम्हाला तीक्ष्ण नजरेनं नरीक्षण करावं लागेल. व्हायरल झालेल्या या फोटोला एक लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. कारण या फोटोत बिबट्याल शोधणं सोपं नाहीय. ज्याच्याकडे तल्लख बुद्धी असेल तोच या बिबट्याला शोधू शकतो. त्यामुळे ज्यांच्याकडे अशी बुद्धी आहे त्यांना बिबट्याला १० सेकंदात शोधायचं आहे.
इथे पाहा फोटो
अजूनही तुम्हाला बिबट्याला शोधण्यात अपयश आलं असेल, तर आता तुम्हाला तुमच्या बुद्धीला कस लावावा लागेल. कारण बिबट्याला पाहणं म्हणजे मातीत लपलेल्या सुईसारखंच आहे. तीक्ष्ण नजर ठेऊन फोटोचं निरीक्षण केलं तरच तु्म्हाला बिबट्या दिसेल, अन्यथा तुम्ही गोंधळातच पडाल. ज्यांनी बिबट्याला शोधलं नाही, त्यांना आता फोटोत बिबट्या कुठं लपला आहे, ते आम्ही सांगणार आहोत. तुम्ही जर फोटो अतिशय काळजीपूर्वक पाहिला, तर बिबट्याचं बछडं तुम्हाला झाडाच्या पाठीमागे बसलेलं दिसेल. या फोटोला प्रतिक्रिया देत एक नेटकरी म्हणाला, मला पाच मिनिटांचं वेळ लागला पण अखेर मी बिबट्याला शोधला.