भारतीय क्रिकेट खेळाडू हार्दिक पांड्याने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अभिनेत्री, मॉडेल नताशा स्टॅन्कोविक हिच्यासोबत साखरपुडा केला. सोशल मीडियावर फोटो शेअर करुन हार्दिकने ही माहिती दिली. हार्दिकने ही माहिती दिल्यानंतर नताशानेदेखील हार्दिकसोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. हे फोटो शेअर झाल्यानंतर काही वेळातच त्याच्यावरील मीम्स व्हायरल झाल्याचं दिसून येत आहे.
सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा काही नेम नसतो. त्यातच मीम्स तर वाऱ्यासारखे पसरतात. असेच हार्दिक आणि नताशाच्या फोटोवरील मीम्स व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये हार्दिक नताशाला प्रपोज करतानाचा एक फोटो आहे. हा फोटो मॉर्फ करण्यात आला असून नताशाच्या फोटोवर रानू मंडलचा फोटो लावण्यात आला आहे. त्यामुळे हे मीम्स वेगाने व्हायरल होत आहे. तसंच अनेक जण आता त्याला ट्रोलही करु लागले आहेत.
इतकंच नाही तर अलिकडेच नताशाने हार्दिकसोबतचा बीचवरील फोटो शेअर केला होता. हा फोटोदेखील मॉर्फ करण्यात आला असून त्यांना मच्छीमारांच्या लूकमध्ये दाखवण्यात आलं आहे.