चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये ICC Champions Trophy 2017 पाकिस्तानकडून भारताला १८० धावांनी पराभूत व्हावं लागलं. तेव्हा प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यांना या पराभवाचे दुःख झाले. या स्पर्धेंत भारताचा पहिलाच सामना होता तो पकिस्तानशी. या सामन्यात पाकिस्तानी संघावर भारताने विजय मिळला होता आणि अखेरच्या सामन्यातही भारत पाकिस्तानला धूळ चारेल असंच चाहत्यांना वाटलं होतं, पण भारतीयांचा पूर्णत: हिरमोड झाला. खरं तर इतर कोणत्याही सामन्यापेक्षा भारत आणि पाकिस्तान हा सामना जगभरातल्या क्रिकेटप्रेमींसाठी खूपच महत्त्वाचा असतो, त्यामुळे सगळ्यांचं लक्ष या सामन्याकडे होतं. आता भारत पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानी चाहत्यांनी भारतीय संघाला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरूवात केली, आपल्या इथल्याही चाहत्यांनी असंच केलं होतं.
पण शेवटी क्रिकेट हा खेळ आहे. इथे हार जीत असतेच. भलेही या खेळाविषयी आपलं भावनिक नातं अधिक जोडलं असलं तरी चाहत्यांनी देखील खिलाडूवृत्ती दाखवली पाहिजे. या सामन्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये सोशल मीडियावर शाब्दिक चकमक जुंपली, पण अशा वेळी दोन्ही चाहत्यांचे वर्तन कसे असायला हवं हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पाहा. मेट्रोमधला हा व्हिडिओ. बहुतेक सामन्याच्या आधीचा हा व्हिडिओ असावा. पाकिस्तानी संघाचे चाहते ट्रेनमध्ये बसून गाणी गात आपल्या संघाला पाठिंबा देत होते. यावेळी दोन भारतीय क्रिकेटप्रेमीही त्यांच्यात सामील झाले. या चाहत्यांनी आपल्यातलं वैर बाजूला ठेवून त्या क्षणाचा पुरेपुर आनंद घेतला. ‘voice of rama’ या फेसबुकवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून आतापर्यंत या व्हिडिओला ३१ हजारांहूनही अधिक शेअर्स आहेत.