लग्नाचा मौसम आहे, तेव्हा हल्ली सोशल मीडियावर काहीना काही नवं पाहायला मिळतं. दोन दिवसांपूर्वीच व्हायरल झालेल्या ‘बोल्ड आणि ब्युटिफुल’ नववधूचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. नेटिझन्सच्या डोक्यावरून हा फिव्हर उतरत नाही तोच फेसबुकवर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तसं भारतीय लग्नात संगीत म्हटलं की बॉलिवूडची गाणी आलीच, त्यातून नववधू नवनवीन गाण्यांना पसंती देताना दिसतात. हल्ली हा ट्रेंडही मोडून एखाद्या इंग्लिश गाण्यावर देखील वऱ्हाडी मंडळी थिरकताना दिसतात. पण ही नववधू थोडी वेगळी आहे बरं का!

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Viral Video : या नववधूला आवडतात ‘चीप थ्रिल्स’!

तिने आपल्या लग्नाच्या संगीत कार्यक्रमात निवडलं ते सलमान भाग्यश्रीच्या सुपरहिट चित्रपटातलं ‘दिल दिवाना’ हे गाणं. या गाण्यावर या नववधूला नाचताना पाहून जणू स्वर्गातून एखादी अप्सराच खाली अवतरली असं वाटत होतं. तिच्या सखींनीही तिला चांगलीच साथ दिली. आता तुम्हाला वाटतं असेल लग्नाचा हा व्हिडिओ भारतातला असेल तर हा समज साफ खोटा आहे. कारण हे लग्न भारतात पार पाडलं नसून ते न्यूयॉर्कमध्ये झालं आहे. इथे राहणाऱ्या पायलने आपला लग्नसोहळ्याल्या खास बॉलिवूड गाण्यांचा तडका दिला आहे. भलेही भारतीय भारताबाहेर असले तरी तिथेही लग्न बॉलिवूडच्या गाण्यांखेरीज पूर्ण होत नाही हे पायलने दाखवून दिले. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत १० लाखांहूनही अधिक लोकांनी पाहिले आहे. आता तुमच्या मित्र मैत्रिणींच्याही लग्नात तुम्हाला काही हटके करायचे असले तर तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच पाहा! कदाचित तुम्हाला यापेक्षाही काहीतरी हटके सुचेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian brides beautiful dance on dil deewana has got over a million views on social media