Flag Unfurl Viral Video : भारतातील विद्यार्थी शिक्षणासाठी किंवा अन्य कामासाठी जेव्हा विदेशात जातात, तेव्हा त्यांच्या हातात भारताचा तिरंगा झेंडा असतो. विद्यार्थी तिरंगा फडकावून भारत देशाची शान अभिमानाने वाढवत असतात. झेंडा फडकवण्याची अशी अधिकृत नियमावली नाहीय. पण देशाबद्दल असलेली निष्ठेची भावना दाखण्यासाठी काही विद्यार्थी झेंडा फडकवत असतात. मात्र, एका विद्यार्थ्याने लंडन विद्यापीठात पदवी घेतल्यानंतर तिरंगा फडकवण्याऐवजी दुसराच झेंडा फडकवल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अधीश आर वली असं या विद्यार्थ्याचं नाव असून त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला केला आहे. व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी या विद्यार्थ्याला धारेवर धरलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विद्यार्थ्याने फडकवला कोणता झेंडा?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अधीश आर वली या विद्यार्थ्याने लंडन विद्यापीठात शिक्षण घेतलं आहे. ही घटना त्याच्या कॉलेजच्या ग्रॅज्यूएशन डे ला घडली. त्यावेळी या विद्यार्थ्याचा पदवी मिळाल्यावर सन्मान करण्यात येत होता. पण त्यावेळी त्याने भारताचा झेंडा न फडकवता कर्नाटकचा झेंडा फडकवला. गृह राज्य कर्नाटकला सन्मान देण्यासाठी झेंडा फडकवला, असं त्या विद्यार्थ्यांने म्हटलं आहे.

नक्की वाचा – Video : कारच्या रुफवर कपलचा खुल्लम खुल्ला रोमान्स, हायवेवरील तो व्हिडीओ झाला व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

त्याच्यासाठी अभिमानाचा क्षण

या विद्यार्थ्याने त्याच्या ट्विटरवर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये म्हटलंय, “मी लंडन सिटी युनिवर्सिटीच्या बायेस स्कूलमधून मॅनेजमेंटमध्ये एमएसची पदवी घेतली आहे. लंडनमध्ये समारोप सोहळ्यात कर्नाटक राज्याचा झेंडा फडकवणं माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट होती.” या विद्यार्थ्याने इंटरनेटवर व्हिडीओ व्हायरल केल्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्यावर सडकून टीका केली. काही लोकांनी त्या विद्यार्थ्याचं समर्थनही केलं आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, ठराज्याचा सन्मान असणं ठीक आहे पण विदेशात असल्यावर सर्वात आधी राष्ट्राचा झेंडा फडकवला पाहिजे.

भारतात झेंड्याचा नियम काय आहे?

भारतीय संविधानानुसार फक्त जम्मू काश्मीरलाच वेगळ्या झेंड्याचा अधिकार दिला आहे. २०१७ मध्ये कर्नाटकने त्यांच्या वेगळा झेंडा करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. राज्य सरकारने त्यांच्या झेंड्याला मान्यता दिली होती. पण केंद्र सरकारकडून यासाठी मान्यता देण्यात आली नाही. त्यामुळे या राज्याला संविधानिक झेंडा मिळाला नाही. संविधानमध्ये राज्यांसाठी वेगळ्या झेंड्यांना मनाई नाही. पण राज्यांचे झेंडे राष्ट्रीय ध्वजासमोर कमी उंचीवर फडकवले पाहिजेत, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian student unfurls karnataka flag instead of indian flag graduation ceremony at london university video goes viral nss