OMG! भल्यामोठ्या भिंतीवर सरसर चढला अजगर! VIRAL VIDEO पाहून घरचेच काय तुम्हीही हैराण व्हाल

या व्हायरल व्हिडीओमधल्या महाकाय अजगराचं वजन इतकं जास्त असताना सुद्धा सपाट भिंतीवर सरसर चढलाय. हा व्हिडीओ जितका हैराण करणार आहे, तितकाच अंगावर काटा आणणारा आहे.

Large-Python
(Photo: Youtube/ ViralHog)

आपण सर्वांनी इंटरनेटवर बरेच व्हिडीओ पाहिले असतील. काही मजेदार असतात तर काही आश्चर्यकारक असतात. तुम्ही बऱ्याचदा अजगराला शिकार करताना, प्राणी-पक्ष्यांना जिवंत गिळताना किंवा आराम करताना पाहिलं असेल, पण आता समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अजगर कोणत्या झाडावर नाही तर एका घराच्या भल्यामोठ्या भिंतीवर सरसर चढताना दिसून आला आहे. सपाट भिंतीवर चढणे ही सोपी गोष्ट नाही, कुठलाही प्राणी असं करु शकत नाही, पण या अजगराला ते चांगलं जमतं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होत आहे, जो लोकांना आवडतानाही दिसतो आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ थायलंडमधला आहे. थायलंडमधल्या एका राहत्या घरात हा भलामोठा अजगर आढळून आला. आपल्या घरात साधारण साप नव्हे तर विशालकाय अजगर घराच्या भिंतीवर चढू लागल्याचं पाहताच घरातील कुटुंबियांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या विशालकाय अजगराचं इतकं वजन मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा हा अजगर सपाट भिंतीवर चढला. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. हा व्हिडीओ जितका हैराण करणारा आहे, तितकाच अंगावर काटा आणणारा देखील आहे.

आणखी वाचा : ‘जंग जारी है, MSP की बारी है’, आंदोलक शेतकऱ्याची लग्नपत्रिका VIRAL

या व्हिडीओमध्ये एक महाकाय अजगर उभ्या भिंतीवर सरपटत घराच्या छतावर चढण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहे. अजगर इतका मोठा आहे की त्याची शेपटी घराच्या जमिनीवर टेकताना दिसून येतेय, तर त्याचं तोंड घराच्या छताला स्पर्श करतंय.

५८ सेकंदाच्या या व्हिडीओतील सर्वात मोठं सरप्राईज काही वेळाने दिसत आहे. अजगर छतावर चढत असताना कॅमेऱ्यासमोर एक काळी-पांढरी मांजर छतावरच दिसते, जी अजगराच्या भीतीने काही अंतरावर उभी राहते. एवढा मोठा अजगर पाहून मांजरही हैराण झाल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. अजगराच्या छतावर येताच मांजरी एका कोपऱ्यात सरकताना दिसून येतेय. मग आहे त्याच जागी स्तब्ध होते.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : जेव्हा सिंहाचा छावा मांजरीच्या आवाजात गर्जना काढू लागतो…,पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : रातोरात स्टार झाला हा बदाम विकणारा व्यक्ती, VIRAL VIDEO मध्ये असं काय आहे ज्याने साऱ्यांनाच वेड लावलंय

या व्हिडीओच्या शेवटी अजगर छतावर चढतो. या व्हिडीओला आतापर्यंत २९ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून अनेकांनी त्यावर कमेंटही केल्या आहेत. हे दृश्य पाहून बहुतेक लोक आश्चर्यचकित होतात. बहुतेक लोकांनी कमेंट करून मांजरीने स्वतःचा जीव वाचवून पळून जावे, असं लिहिलंय. मांजर पळून जाऊ शकते की नाही हे प्रत्येकजण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. एकाने सांगितले की, मांजर सुद्धा अजगराला पाहून आश्चर्यचकित झाल्याचे दिसते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Large python climbing up the wall of house while cat stare viral video prp

Next Story
Viral Video : बर्फवृष्टीमुळे रस्ते झाले बंद; थेट JCB घेऊन नवरदेव पोहचला मांडवात
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी