Leopard Became Stone Video: सिंह, वाघ, साप आणि बिबट्या हे प्राणी स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी इतर प्राण्यांची शिकार करतात. जर आपण या प्राण्यांमध्ये बिबट्याबद्दल बोलायचं झालं तर ते अत्यंत चलाख शिकारी म्हणून ओळखले जातात. स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी आणि आपले वर्चस्व टिकवण्यासाठी एक प्राणी दुसऱ्याला आपली शिकार बनवतो. पण बिबट्या हा असा शिकारी आहे जो अतिशय हुशारीने आपल्या भक्ष्याची शिकार करतो आणि एकदा आपली शिकार त्याने ठरवली की मग त्याला फस्त केल्याशिवाय तो शांत राहत नाही. बिबट्याच्या अशाच हटके शिकारीचा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये बिबट्या आपली शिकार पकडण्यासाठी चक्क दगड बनलाय. हे ऐकून तुम्हाला सुरूवातीला आश्चर्य वाटेल. पण हे खरंय. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून एखाद्या जंगल परिसरातला हा व्हिडीओ दिसून येत आहे. कच्चा रस्ता आणि झाडे व्हिडीओत दिसत आहेत. कच्च्या रस्त्यावर बिबट्या बसलेला दिसतो. बिबट्या न हलता अगदी दगडासारखा बसलेला या व्हिडीओमध्ये दिसत आहे. काही वेळाने बिबट्या आपल्या भक्ष्याची वाट पाहत असल्याचे समोर आले. शिकार म्हणून एक हरिण कच्च्या रस्त्याजवळ येते. दगड बनून बसलेला बिबट्या आपली शिकार जवळ येण्याची वाट पाहत असतो. तो आणखी काही काळ त्याच स्थितीत बसतो. पण हरणाला बिबट्याचा सुगावा कसा लागतो आणि तेथून पळून जातो हे मात्र कळत नाही. बिचाऱ्या बिबट्याला हुशारी दाखवूनही शिकार करता आली नाही.

आणखी वाचा : आधी येऊ लागला धूर, अन् बघताच क्षणी बुलेटने घेतला पेट, सोशल मीडियावर Video Viral

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : नवरीसमोरच केलं असं काही की खवळला नवरदेव; स्टेजवरच सुरू झाली मारामारी, पाहा VIRAL VIDEO

अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ट्विटरवर हा व्हिडीओ आतापर्यंत ३.५ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तसंच १२ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाइक देखील केलं आहे. हा व्हिडीओ गेल्या वर्षीही खूप चर्चेत आला होता. आता पुन्हा एकदा हा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Leopard became stone for deer wanted to hunt smartly see viral video prp
First published on: 21-05-2022 at 19:10 IST