Mahakumbh 2025 Viral Video : महाकुंभात स्नान करण्यासाठी जगभरातून लोक मोठ्या श्रद्धेन येत आहेत. जगातील सर्वात मोठ्या या धार्मिक मेळ्यात ४० ते ४५ कोटी भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. भाविकांची इतकी मोठी संख्या लक्षात घेता अनेक व्यावसायिक छोट्या छोट्या व्यवसायातून भरपूर कमाई करत आहेत. अनेकांनी कुंभनगरीत स्वत:चे दुकान थाटले आहे. मात्र काही लोक कोणताही खर्च न करता रोज हजारो रुपये कमवत आहेत. अशातच कुंभमेळ्यातील एका प्रियकराचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात तो सांगतोय की, त्याच्या प्रेयसीने दिलेली आयडिया वापरुन एकही रुपया खर्च न करता कुंभमेळ्यात तो रोज ५ ते १० हजार रुपयांची कमाई करतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर या प्रियकाराचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय, ज्यामध्ये तो व्हिडीओ बनवणाऱ्याला सांगितले की, तो रोज एक रुपयाही खर्च न करता दररोज हजारो रुपयांची कमाई करतोय. त्याच्या प्रेयसीने त्याला या व्यवसायाची कल्पना दिली आणि आज तो खूप नफा कमवत आहे. यामुळे तो त्याचा प्रेयसीचा खूप आदर करतो.

तो तरुण नेमका कोणता व्यवसाय करतोय?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तो प्रियकर प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला सांगतोय की, महाकुंभ मेळ्यात तो दात घासण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कडुनिंबाच्या काड्या विकतो. हे काम तो गेल्या पाच दिवसांपासून करतोय, यातून त्याने आतापर्यंत ३० ते ४० हजार रुपयांची कमाई केली आहे. अशाप्रकारे तो एका दिवसात ९ ते १० हजार रुपये सहज कमावतोय. यापुढे तो सांगतो की, माझे काम असे आहे की, मी आता जितके जास्त धावपळ करेन तितके पैसे कमवू शकेन.

हा व्हिडिओ @Adarshtiwari20244 नावाच्या इन्स्टा अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. जो आत्तापर्यंत कोट्यावधी लोकांनी तो पाहिला आणि त्यावर कमेंट केली आहे. एका यूजरने लिहिले की, ‘तो किती निष्पापपणे सत्य बोलत होता हे बघून मजा आली.’ तर दुसऱ्याने लिहिले, ‘या तरुणाची प्रेयसी खरोखरचं त्याच्यावर खूप प्रेम करत असावी… म्हणूनच तिने त्याला असा सल्ला दिला आहे.’

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahakumbh mela 2025 man sells datun in kumbh and earn 5 thousand per day interesting video viral sjr