VIRAL VIDEO : क्या बात है! स्कायडायव्हिंग करताना उंच आकाशातून आई-वडिलांना केला व्हिडीओ कॉल

यावेळी आपल्या मुलाला इतक्या उंचावर तरंगताना पाहून आई वडील आश्चर्यचकित झाले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

Skydiving-Video-Viral
(Photo: Instagram/ pubity )

स्कायडायव्हिंग हा साहसप्रेमींसाठी आवडता अनुभव आहे. स्कायडायव्हिंगद्वारे आपण आकाशात पक्ष्याप्रमाणे उडू शकतो आणि आपल्या डोळ्यांनी खाली जग पाहू शकतो. इंटरनेटवर स्कायडायव्हिंगचे वेगवेगळे व्हिडीओ शेअर होत असतात. पण हा व्हिडीओ काहीसा वेगळा आहे. कारण या व्हिडीओमधल्या मुलाने स्कायडायव्हिंगचा हा अनुभव आई व़डिलांसोबत शेअर करण्यासाठी उंच आकाशातून व्हिडीओ कॉल केला. यावेळी आपल्या मुलाला इतक्या उंचावर तरंगताना पाहून आई वडील आश्चर्यचकित झाले. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

खुल्या आकाशात पक्ष्यांप्रमाणे उडता येईल, असे अनेकांचं स्वप्न असतं. असंच स्वप्न या व्हायरल व्हिडीओमधल्या मुलाने पाहिलं होतं. स्कायडायव्हिंगचा हा अनुभन आई वडिलांना घेता यावा यासाठी त्याने उंच आकाशातून व्हिडीओ कॉल केलाय. हा मुलगा जमिनीपासून कित्येक मीटर उंचीवर तरंगताना दिसून येतोय. या व्हायरल व्हिडीओमधल्या मुलाचं नाव रॉगर स्काईप्ड असं आहे. हा व्हिडीओ ऑस्ट्रेलियातील सिडनी इथला आहे. सुरूवातीला त्याच्या आई वडिलांना तो एखाद्या बसमध्ये बसला असावा असं वाटू लागतं. पण व्हिडीओ कॉल केल्यानंतर मुलाला हवेत तरंगताना पाहिल्यानंतर आई वडिलांना आश्चर्याचा धक्काच बसला. आपल्या मुलाला काही होणार तर नाही ना याची भीती या आईच्या चेहऱ्यावर दिसून येत होती. पण त्यानंतर मुलाचा स्कायडायव्हिंगचा अनुभव पाहून त्यांनी सुद्धा हा क्षण एन्जॉय केला.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : हिमालयातील बर्फाच्छादित शिखरावर ITBP जवानांनी खेळला लहानपणीचा ‘हा’ खेळ

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : वऱ्हाडींना मागे टाकत नवरदेव वरातीत एकटाच नाचू लागला, या गाण्यावरचा क्लासिकल डान्स VIDEO VIRAL

हा व्हिडीओ pubity नावाच्या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलाय. एक दिवसांपूर्वीच हा व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर बघता बघता हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की आतापर्यंत या व्हिडीओला ८ लाख ८२ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाईक केलंय. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर आई वडिलांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स पाहून मुलाचं कौतुक केलंय. अनेक युजर्सनी आपल्या वेगवेगळ्या भावना कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Man connects with parents on video call while skydiving prp

Next Story
शिखर धवनला वडिलांकडून मारहाण, आधी कानाखाली मारली मग लाथा बुक्क्यांनी मारहाण केली; Viral झाला घरातील ‘तो’ Video
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी