सोशल मीडियावर वाहवा मिळवण्यासाठी काही माणसांना विनाशकाले विपरीत बुद्धी कधी सुचेल याचा नेम नाही. वाघ, सिंह यांसारख्या हिंस्र प्राण्यांसोबत खेळ करणे, सापाला चुंबन घेणं तसंच मगरीच्या वेशात जाऊन जीवंत मगरीशी छेडछाड करणे, असे धक्कादायक प्रकार व्हायरल होणाऱ्या व्हिडीओच्या माध्यमातून दिसत असतात. अनेकदा अशा माणसांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. असाच एक थरारक व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. मगरीच्या वेशात आलेल्या पठ्ठ्याने जीवंत मगरीला चावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मगरीनेही जबडा उघडला आणि भलतंच घडलं. ही सर्व थरारक दृष्य कॅमेरात कैद झाली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय घडलं?

एका तलावाच्या किनाऱ्यावर मगरींचा कळप विश्रांती घेत असतो. पण तितक्यात एक व्यक्ती मगरीचा खोटा वेश करुन मगरीसोबत खेळ करण्याचा प्रयत्न करतो. मगरीच्या जवळ जात तिच्यासारखा जबडा उघडण्याचा प्रयत्न करुन मगरीला चावायला जातो. पण ती मगरही पलटवार करुन त्या व्यक्तीला जशाच तसं उत्तर देण्याचं प्रयत्न करते. मगरीचा वेश धारण केलेला व्यक्ती मगरीला थेट आव्हानंच देत असल्याचं व्हिडीओत पाहू शकता. मगर चावण्याच्या प्रयत्न करते, तेव्हा तो व्यक्तीही तिच्यासारखाच हावभाव करून चावायला जातो. या दोघांच्या भांडणात भलतंच घडतं.

इथे पाहा व्हिडीओ

मगरीच्या वेशात जाऊन एका व्यक्तीने जीवंत मगरीला चावण्याचा प्रयत्न केल्याचा व्हिडीओ फिशींग डॉक नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा थरारक व्हिडीओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण मगरीच्या वेशात गेलेल्या तरुणाने मगरीशी पंगा घेतल्यानंतर काही क्षणातच मगर पाण्यात उडी मारते. मगरीच्या हल्ल्यात अनेक माणसं जखमी झाल्याचे व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आलं आहे. पण या व्हिडीओत नेमकं उलट घडलं आहे. मगरीच्या वेशात आलेल्या माणसानं जीवंत मगरीला घाबरवून पाण्यात उडी मारण्यास भाग पाडलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man wears crocodile costume tried to bite in front of crocodile flock shocking viral video makes you scared nss