Man Found After 27 Years in Maha Kumbh Mela 2025 : कुंभमेळ्यात हरवलेल्या लोकांविषयी तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण २७ वर्षांपूर्वी घर सोडून गेलेला व्यक्ती कुंभमेळ्यामुळे सापडल्याची घटना तुम्ही कधी ऐकलीय का? यंदाचा महाकुंभ मेळा विविध कारणांनी सतत चर्चेत आहे. १४४ वर्षांनी आलेला या महाकुंभ मेळ्याची इतिहासात नोंद होईल, असं नियोजन करण्यात आलंय. तसंच, देशभरातली कोट्यवधि लोक या महाकुंभ मेळ्यात सहभागी होत आहेत. या अफाट गर्दीतही २७ वर्षांपूर्वी घर सोडून गेलेल्या एका व्यक्तीला त्याच्या कुटुंबीयांनी ओळखलं आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

२७ वर्षांनी कसा सापडला व्यक्ती?

१९९८ मध्ये झारखंड येथील धनबाद येथून गंगासागर यादव गायब झाले होते. त्यांच्यासारखा दिसणारा एक व्यक्ती २७ वर्षांनी थेट महाकुंभ मेळ्यात अघोरी संन्यासीच्या रुपात त्याच्या नातेवाईकांना दिसला. या नातेवाईकांनी तत्काळ त्या संन्यासाचा फोटो काढला आणि गंगासागरच्या पत्नीला पाठवला. या संन्यासाची दाढी आणि केस लांबलचक असतानाही हा संन्यासीच माझा पती असल्याचा दावा गंगासागरच्या पत्नी केलाय. कारण, त्यांचे लांब दात, कपळाला असलेली दुखापत आणि गुडघ्यांवरील जखमां या खुनांवर संबंधित व्यक्ती गंगासागर असल्याचा दावा करण्यात येतोय. या संन्यासाची ओळख बाबा राजकुमार अशी आहे. ते ६५ वर्षांचे असून त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. त्यांनी या कुटुंबाला ओळखलं नाही. तसंच, ते झारखंडचे नसून वाराणसीचे असल्याचा दावा केला आहे. त्यांनी गंगासागर यादव यांच्याशी कोणताही संबंध नसल्याचंही स्पष्ट केलंय.

कुटुंबाने का केली डीएनए चाचणीची मागणी

बाबा राजकुमार यांनी या कुटुंबाचा सदस्य असल्याचा दावा फेटाळून लावल्याने या कुटुंबाने आता डीएनए चाचणीची मागणी केली आहे. त्यांनी कुंभमेळा पोलिसांना यासंदर्भात कळवलं असून त्यांनी ही ओळख पटवण्याकरता डीएनए चाचणीची मागणी केली आहे. आम्ही कुंभमेळा संपेपर्यंत वाट पाहू. जर चाचणी जुळली नाही तर आम्ही बाबा राजकुमार यांची माफी मागू”, असं त्यांचे भाऊ मुरली यादव म्हणाले. तर त्यांची मुलं कमलेश आणि विमलेश यांनीही डीएनएची मागणी केली आहे.

सत्तावीस वर्षांपूर्वी आम्ही आमच्या गावात माझ्या धाकट्या दीराचं लग्न होतं. या लग्नासाठी साडी आणायला जातो, असं सांगून ते निघून गेले. त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. गेले २७ वर्षे आम्ही त्यांचा शोध घेत होतो. दरम्यान, एका नातेवाईकाने कुंभमेळ्यातील एक व्हिडिओ आम्हाला पाठवला. तो व्हिडिओ पाहताच आम्ही थेट कुंभमेळ्यात गेलो. तिथे गेल्यावर त्याच्याशी बोललो. पण त्याने आम्हाला ओळखण्यास नकार दिला”, अशी माहिती गंगासागर यादव यांची पत्नी धनवा देवी म्हणाल्या.

गंगासागरचा धाकटा भाऊ मुरली यादव म्हणाले, “कुंभमेळ्यात उपस्थित असलेल्या आमच्या एका नातेवाईकाने गंगासागरसारखा दिसणारा माणूस पाहिला आणि त्याचा फोटो काढला. त्यामुळे आम्ही पुन्हा आमच्या भावाला भेटणार ही आशा आमच्या मनात निर्माण झाली.” गंगासागरची आई कालो देवी यांनीही मुलाने घरी परतण्याची विनंती केली आहे. दरम्यान, डीएनए चाचणी केल्यानंतर बाबा राजकुमारच गंगासागर यादव असतील हे सिद्ध होईल, अशी कुटुंबियांना आशा आहे. त्यामुळे कुटुंबातील काही सदस्य आता घरी परतले असून काहीजण कुंभमेळ्यात बाबा राजकुमार यांच्यावर नजर ठेवून आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Man who went missing 27 years ago found as a monk in maha kumbh 2025 by family askign dna test sgk