फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्ग याने फेसबुकवर पोस्ट लिहून जाहीर माफी मागितली आहे. मार्क नेहमीच जगभरातील ताज्या घडामोडींवर आपलं मत मुक्तपणे व्यक्त करत असतो. एखादी गोष्ट आवडली नाही की तो जाहीररित्या त्यावर आपली नाराजी व्यक्त करतो. काही महिन्यांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या मुस्लिम विरोधी धोरणांच्या विरोधात त्याने आवाज उठवला होता. पण आता एका वेगळ्याच कारणाने त्याने माफी मागितली आहे. रशियाने अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूने जनमत तयार करण्यासाठी फेसबुकचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केल्याचं पुराव्यानिशी समोर आलं. वॉशिग्टंन पोस्टने आपल्या बातमीत या संदर्भातलं वृत्त देखील प्रकाशित केलं आहे आणि यामुळे दु:खी झालेल्या मार्कने जाहीरपणे माफी मागितली आहे. ‘गेल्या वर्षभरात माझ्याकडून जे लोक दुखावले गेले त्यांची मी जाहीर माफी मागतो. माझ्या कामामुळे लोक एकत्र येण्याऐवजी ते अधिक दुरावले गेले, त्यामुळे हे दु:ख अधिक आहे. ही परिस्थिती मी नक्कीच सुधारण्याचा प्रयत्न करेन’ असं म्हणत मार्कने फेसबुकवर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : मार्क झकरबर्गला आणि प्रिसिलाला फेसबुकवर ब्लॉक करणं अशक्य

तर दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील फेसबुकवर आरोप केले आहेत. फेसबुक हे पूर्णपणे आपल्या विरोधात काम करते, असं ट्रम्प यांचं म्हणणं आहे. त्यांच्या आरोपांना देखील मार्कने फेसबुक पोस्टद्वारे उत्तर दिलं. ‘ट्रम्प म्हणतात की फेसबुक त्यांच्या विरोधात आहे तर उदारमतवादी म्हणतात आम्ही ट्रम्प यांना मदत केली. पण सत्य काहीतरी वेगळंच सांगतं आहे. लोकांच्या माहितीपेक्षाही वेगळी भूमिका २०१६ मध्ये झालेल्या निवडणुकांमध्ये फेसबुकने घेतली होती. लोकांपर्यंत कोणतीही चुकीची माहिती जाऊ नये यासाठी फेसबुकने नेहमीच प्रयत्न केला. कोणत्याही गोष्टीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चा झाली नाही ती फेसबुकमार्फत झाली. प्रत्येक उमेदवारचं स्वत:चं फेसबुक पेज होतं आणि त्याद्वारे ते कोट्यवधी लोकांशी संवाद साधत होते.

नक्की वाचा मार्क झकरबर्ग आणि प्रिसिलाची ‘टॉयलेट एक प्रेमकथा’

आम्ही प्रत्येक लोकांना फेसबुकद्वारे मतदान करण्याचं आवाहन केलं. मतदान प्रक्रियेत लोकांचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढला आणि यात फेसबुकचा वाटा मोठा होता.’ असे लिहित मार्कने ट्रम्प यांनाही उत्तर दिले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mark zuckerberg apologises for negative effects of facebook and asked for forgiveness