सोशल मीडियावर एखादा व्हिडियो व्हायरल होणे आणि त्याची सगळीकडे चर्चा होणे हे आता अतिशय सामान्य झाले आहे. असाच एक व्हिडियो नुकताच व्हायरल झाला आहे. यामध्ये दोन महिला एकमेकींशी जोरदार हाणामारी करताना दिसत आहेत. आता हा प्रसंग एखाद्या रस्त्यावर किंवा मॉलमध्ये वगैरे झाला असावा असे तुम्हाला वाटेल. पण मॅकडोनल्डसमध्ये ही घटना घडली. या दोघींची इतकी जुंपली आहे की त्या एकमेकांशी जोरदार मारामारी करत असल्याचे दिसत आहे. अमेरिकेतील ही घटना कॅमेरात कैद झाल्याने ती कमी कालावधीत व्हायरल झाली. या दोन महिलांमधील एक जण मॅकडोनल्डची कर्मचारी असून दुसरी ग्राहक आहे. आता यांच्यामध्ये नेमके भांडण कशामुळे झाले असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचे कारण अतिशय क्षुल्लक आहे.

ग्राहक महिलेने त्याठिकाणी ठेवण्यात आलेला सोडा चोरुन आपल्या जागेवर जाऊन बसली. त्यावेळी कर्मचारी महिलेने तिला पाहिल्याने ती या ग्राहक महिलेस मारण्यासाठी धावली आणि त्या दोघींमध्ये हाणामारी सुरु झाली. हा व्हिडियो याठिकाणी खाण्यासाठी आलेल्या मैरी डेयाग या मुलीने रेकॉर्ड करुन यु-ट्यूबवर अपलोड केला. जेव्हा या कर्मचारी महिलेने ग्राहक महिलेला चोरी करताना पाहिले तेव्हा ग्राहक महिलेने तिच्या अंगावर फ्रेंच फ्राईज आणि मिल्कशेक फेकला. त्यानंतर कर्मचारी महिला या ग्राहक महिलेला मारायला धावली. या दोघींचे भांडण पाहून मॅकडोनल्डमधील इतर कर्मचारी ते भांडण सोडविण्यासाठी धावले. मात्र त्या दोघींनाही आवरणे या कर्मचाऱ्यांना काहीसे अवघड होत होते. या भांडणात ग्राहक महिलेचे कपडेही फाटले.