बाजारात सध्या नरेंद्र मोदी यांचे सॉफ्ट टॉईज विक्रिसाठी आले आहेत. विशेष म्हणजे फक्त छोट्या मुलांसाठी हे सॉफ्ट टॉईज विक्रिसाठी ठेवण्यात आले आहेत. मोदी यांची फॅन फॉलोईंग मोठी आहे. काही दिवसांपूर्वी फॅशनविश्वात मोदी जॅकटची क्रेझ होती. मोदी जसे कुडत्यावर जॅकट घालतात तशी फॅशन आली होती. पण आता चक्क टिकलेस या कंपनीने नरेंद्र मोदी यांचा सॉफ्ट टॉईज बनवला आहे. विविध इ कॉमर्स वेबसाईटवर नरेंद्र मोदीचे हे सॉफ्ट टॉईज विक्रिसाठी ठेवण्यात आले आहेत.
दोन दिवसांपासून फ्लिपकार्ट, स्नॅपडिल यासारख्या इ कॉमर्स वेबसाईटवर नरेंद्र मोदी यांचे सॉफ्ट टॉईज विक्रिसाठी ठेवण्यात आले आहेत. नरेंद्र मोदीसारखेच कपडे या सॉफ्ट टॉईजला देखील घालण्यात आले आहे. भगवा कुडता आणि मोदी जॅकट घालेले हे टॉईज ४० सेंटीमीटर लांब आहे. १ हजार रुपयांच्या आसपास या टॉईजची किंमत आहे. इतकेच नाही तर खास लहान मुलांसाठी विविध साईट्ने ३० ते ५० टक्क्यांच्या आसपास मूळ किंमतीत सवलत दिली आहे. मोदीं हे लहान मुलांत खूपच प्रसिद्ध आहेत. आतापर्यंत मोदींनी अनेक लहान मुलांना मदत केल्याची उदाहरणे देखील आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी खास मोदींचे टॉईज कंपनीने बनवले आहे.
पण मोदींचे सॉफ्ट टाईज बनवण्याची ही पहिलीच घटना नाही याआधीही मोदींचे सॉफ्ट टॉईज बनवण्यात आले होते. याच महिन्यात नरेंद्र मोदी हे चीनमध्ये जी २० शिखर परिषदेला गेले होते तेव्हा चीनच्या काही कलाकरांनी मोदींचे सॉफ्ट टॉईज बनले होते. मोदींसोबत अन्यही देशांच्या नेत्यांचे सॉफ्ट टॉईज बनवले होत. पण टिकलेस कंपनीचे सॉफ्ट टॉईज हे सगळ्यापेक्षा वेगळे असून ते भारतात विक्रिसाठी उपलब्ध असल्याचे समजते. साधरण ६ ते ९ वयोगटातील मुलांना नजरेसमोर ठेवून ते बनवण्यात आले आहे.