मंगळाबद्दल जाणून घेण्याचं कुतूहल अनेकांना असेल पण अंतराळवीर सोडले तर ही संधी सामान्य माणसांना मिळणं तसं अवघडच. पण ती संधी ‘नासा’ या अमेरिकन संशोधन संस्थेनं लोकांना दिली आहे, त्यामुळे नासाच्या ‘इनसाईट मिशन’ या मोहिमेसाठी जगभरातील लाखो लोकांनी नासाकडे अर्ज करायला सुरूवात केली आहे. या मोहिमेसाठी इच्छुक असणाऱ्या लोकांच्या यादीत भारत हा तिसऱ्या क्रमांकावर असून मंगळावर जाण्यासाठी १ लाख ३८ हजार ८९९ भारतीयांनी तिकीट बुक केलं असल्याचं नासाने सांगितले आहे.
जसा देश तसा वेश!, टेनिसपटू रॉजर फेडरर कोर्टवर चक्क ‘किल्ट’मध्ये अवतरला
या सर्व नागरिकांनी नासाच्या ‘इनसाईट मिशन’ (इंटेरिअर एक्सप्लोरेशन युसिंग सिस्मिक इन्वेस्टीगेशन्स, जीओडेसी अँड हीट ट्रान्सपोर्ट)च्या माध्यमातून आपलं रजिस्ट्रेशन केलं आहे. नासाचं हे ‘InSight मिशन’ ५ मे २०१८ रोजी सुरु होणार आहे. ज्या नागरिकांनी मंगळ ग्रहावर जाण्यासाठी बुकिंग केलं आहे त्यांना नासातर्फे ऑनलाईन बोर्डिंग पास देण्यात येणार आहे. रजिस्ट्रेशन झालेल्या नागरिकांचं नाव सिलिकॉन चिपवर इलेक्ट्रॉनिक्स बीमच्या मदतीने कोरण्यात येणार आहे. चिपवर कोरण्यात आलेली अक्षरं ही केसाच्या एक हजाराव्या भागाहूनही अधिक पातळ असणार आहेत. ही चिप नंतर मंगळावर पाठवण्यात येणार आहे.
वडील झोपेत असताना ९ वर्षांच्या मुलीने फोनवरून बुक केली डिस्नेलॅण्डची ट्रीप
भारतीयांचा या मोहिमेला मिळालेला प्रतिसाद खूपच जास्त आहे. ‘मंगळयान’ मोहिमेनंतर भारतीयांमध्ये या ग्रहाबद्दल कुतूहल वाढलं, त्यामुळे या मोहिमेला भारतीयांकडून जास्त प्रतिसाद लाभला असल्याचे नासाने सांगितले. नासाच्या मते, मंगळ ग्रहावर जाण्यासाठी जगभरातील २४ लाख २९ हजार ८०७ नागरिकांनी अर्ज केले आहेत. यात अमेरिकन नागरिकांचे प्रमाण जास्त आहे. अमेरिकेतल्या ६ लाख ७६ हजार ७७३ नागरिकांनी नोंदणी केली आहे तर चीनमधून २ लाख ६२ हजार ७५२ नागरिकांनी नोंदणी केली आहे.