आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. नायडू यांच्या टीडीपी पक्षाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. एनडीएला लोकसभेत बहुमत मिळाल्याने ठरल्यानुसार आंध्र प्रदेश विधानसभेत टीडीपी सरकार बनवणार आहे. पण, लाइटहाऊस जर्नलिझमकडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होणारा एक व्हिडीओ समोर आला; ज्यामध्ये लोक तेलुगू देसम पक्षाचे एन. चंद्राबाबू नायडू यांचे फोटो (पोर्ट्रेट) जाळताना दिसले आहेत. टीडीपीने सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला पाठिंबा दिल्याच्या निषेधार्थ लोकांनी त्यांचे फोटो जाळले, असा दावा करण्यात आला होता. पण, आमच्या तपासादरम्यान एक वेगळीच माहिती समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

@OBCUMASHANKAR युजरने ने हा व्हिडीओ त्यांचा एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर केला आहे.

इतर वापरकर्तेदेखील हाच व्हिडीओ शेअर करीत आहेत.

तपास :

आम्ही व्हिडीओ डाऊनलोड करून, त्याचा तपास सुरू केला. त्यादरम्यान आम्हाला २९ मार्च २०२४ रोजी न्यूजमीटरवर अपलोड केलेली एक बातमी आढळली.

https://telugu.newsmeter.in/andhra-pradesh/anantapur-urban-tdp-office-attacked-727029#google_vignette

वृत्तात नमूद केले आहे की, तेलुगू देसम पक्षाने मार्च २०२४ मध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा केली. राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर गट; जो अनेक वर्षांपासून तिकिटाच्या आशेवर होता, तो या निर्णयावर नाराज होता आणि त्यांच्या गटाने हा संताप व्यक्त केला होता.

तसेच दी न्यू इंडियन एक्स्प्रेसवरही आम्हाला ही बातमी सापडली.

https://www.newindianexpress.com/states/andhra-pradesh/2024/Mar/30/andhra-pradesh-tdp-faces-strong-dissent-over-choice-of-candidates-in-final-list

अहवालात असे नमूद केले आहे की, विधानसभा आणि लोकसभेच्या जागांसाठी उमेदवारांची चौथी व अंतिम यादी जाहीर केल्याने टीडीपीमध्ये नाराजी पसरली आहे. टीडीपी कार्यकर्त्यांनी उमेदवारनिवडीचा निषेध करीत अनंतपूर आणि गुंटकल विधानसभा मतदारसंघातील टीडीपी कार्यालयातील फर्निचरचे नुकसान केले आणि प्रचार साहित्य जाळले, असे सांगण्यात येत आहे.

आम्हाला हा व्हिडीओ फेसबुकवर अपलोड केल्याचेदेखील आढळले.

हा व्हिडीओ २९ मार्च २०२४ रोजी अपलोड करण्यात आला होता. तसेच कॅप्शनमध्ये म्हटले आहे, ‘#EndOfTDP’.

https://www.facebook.com/share/v/3TTiBB6Kpg5zrU19/

एबीपी लाइव्हनेदेखील यूट्यूब शॉर्ट्सच्या स्वरूपात अपलोड केलेले व्हिज्युअल्सदेखील आम्हाला आढळली आहेत.

https://telugu.abplive.com/short-videos/andhra-pradesh/gunthakal-tdp-leaders-angry-153739

आम्हाला यूट्यूब चॅनल समयम तेलुगूवर एक व्हिडीओदेखील सापडला; जो व्हायरल झालेल्या व्हिडीओसारखाच आहे.

व्हिडीओच्या वर्णनात नमूद केले आहे की, टीडीपी कार्यकर्त्यांनी चंद्राबाबू नायडू यांचा फोटो जाळला आणि जयराम यांचा निषेध केला आहे.

निष्कर्ष : टीडीपी कार्यकर्त्यांनी एन. चंद्राबाबू नायडू यांचा फोटो जाळण्याचा जुना व्हिडीओ आता अलीकडील घटनेप्रमाणे शेअर करून दावा केला आहे की, टीडीपीने भाजपाला पाठिंबा दिल्यानंतर लोक संतप्त झाले आहेत. पण, आमच्या तपासादरम्यान व्हायरल दावे दिशाभूल करणारे आहेत. हा मार्चचा व्हिडीओ आहे, अशी माहिती समोर आली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netizens burn portrait of n chandrababu naidu for his support for bjp andhra pradesh tdp faces strong dissent over choice asp