The Night Manager Viral Video : बँकांची फसवणूक करुन भारतातून फरार झालेल्या प्रसिद्ध उद्योगपती विजय मल्ल्याची सोशल मीडियावर पुन्हा एकदा तुफान चर्चा रंगलीय. १७ फेब्रुवारीला डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘द नाईट मॅनेजर’ वेब सीरिज प्रदर्शित झाली. ज्येष्ठ अभिनेता अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर आणि अभिनेत्री सोभिता धुलिपाला यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. एकीकडे ‘द नाईट मॅनेजर’ या वेब सीरिजने ओटीटीवर धुमाकूळ घातला असतानाच दुसरीकडे मात्र नेटकऱ्यांनी एका नव्या चर्चेला उधाण आणलं आहे. या वेब सीरिजमध्ये एका एपिसोडमध्ये वकिलाचं पात्र दाखवण्यात आलं आहे. ही दृष्य पाहिल्यानंतर तमाम प्रेक्षकांचा गोंधळ उडाला आहे. कारण अनेकांना वाटलं की, या वेब सीरिजमध्ये विजय मल्ल्याने अभिनय केला आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलिंग सुरु केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘द नाईट मॅनेजर’ वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलेल्या एका सीनमध्ये विजय मल्ल्या आहे, अशा प्रतिक्रिया इंटरनेटवर उमटू लागल्या आहेत. नेटकऱ्यांनी याबाबतचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करुन जोरदार ट्रोलिंग सुरु केली आहे. व्हिडीओ शेअर करत नेटकऱ्यांनी म्हटलंय, धक्कादायक!!! हॉटस्टारवर प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘द नाईट मॅनेजर’ वेब सीरिजमध्ये विजय मल्ल्याने छोटी भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे एका वकिलाची भूमिका साकारली आहे, अशा शब्दात नेटकऱ्यांनी खिल्ली उडवली आहे.

नक्की वाचा – Video : चित्रपटातही सुपरहिट अन् जिममध्येही दिसतेय फिट, या प्रसिद्ध अभिनेत्रीचा वर्कआऊटचा व्हिडीओ व्हायरल

इथे पाहा व्हिडीओ

नेटकऱ्यांनी विजय मल्ल्याची खिल्ली उडवत ट्रोलिंग सुरु केल्यानंतर तुम्हाला एक प्रश्न नक्की पडला असेल की, ही भूमिका कोणत्या अभिनेत्यानं साकारली आहे? अक्षदीप साबीर असं त्या अभिनेत्याचं नाव आहे. विजय मल्ल्यासारखा हुबेहुब दिसणारा रोल साबीरने केला आहे. अनिल कपूरचा कायदेतज्ज्ञ म्हणून गुरुविंदर जीवी या नावाने त्याने भूमिका साकारली आहे. अनेकांनी हा एपिसोड पाहिल्यानंतर विजय मल्ल्या असल्याचं मतं सोशल मीडियावर व्यक्त केलं. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, त्याला (विजय मल्ल्या) स्वत:लाच एका वकीलाची गरज आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Netizens says vijay mallya plays a cameo in night manager web series shocking video clip goes viral on instagram nss