आयआरसीटीसीनं IRCTC तिकीट आरक्षित करण्याच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत, त्यामुळे पुढच्या वेळेला ऑनलाइन पद्धतीने तिकीट आरक्षित करणार असाल तर हे नियम नक्कीच फायद्याचे ठरू शकतात. या नव्या नियमानुसार ज्येष्ठ नागरिकांना यापुढे तिकीट आरक्षित करताना सवलत मिळणार आहे. त्याचप्रमाणे ट्रेन जर निर्धारित वेळेप्रमाणे तीन तास उशीराने धावत असेल तर ई- तिकीट असलेल्या प्रवाशांना रेल्वे भाडे परत मिळणार आहे.

अनेक कारणांमुळे लांब पल्ल्यांच्या गाड्या उशीराने धावतात आणि प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. अशावेळी ई-तिकीट असणारे जे प्रवाशी आपली तिकीट रद्द करतील त्यांना तिकिटीचे संपूर्ण पैसे परत मिळणार आहेत. नव्या नियमांनुसार, जर ट्रेन निर्धारित वेळेपेक्षा तीन तास उशीराने धावत असतील तर प्रवशांना या सेवेचा लाभ घेता येणार. ई-तिकीट रद्द केल्यानंतर लगेच प्रवाशांच्या खात्यामध्ये अर्धी रक्कम जमा होणार आहे. उर्वरित ५०% टक्के रक्कम ही प्रवाशांच्या खात्यात नंतर जमा होणार आहे. ट्रेन निर्धारित वेळेपेक्षा उशीरा का आली? यासंबंधीचा चौकशी अहवाल आल्यानंतर प्रवाशांच्या खात्यात उर्वरित रक्कम ५०% टक्के रक्कम जमा होईल.

त्याचप्रमाणे आईआरसीटीसीवर तिकीट आरक्षित करताना प्रवाशांना नागरिकत्त्वदेखील विचारले जाणार आहे. नागरिकत्त्वाच्या रकाना भरल्यानंतर त्यांना आरक्षण मिळणार आहे. लवकरच हा नवा नियमदेखील लागू होणार आहे.