वर्तमानपत्राचा वापर काय? असा सवाल आपल्याकडे विचारला तर एखादा बुद्धीजीवी प्राणी आजूबाजूच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी त्याचा वापर करतो असे ऐकायला मिळेल. तर काही जण टाकाऊ झालेला वर्तमानपत्राचे अनेक फायदे देखील सांगतील. मात्र जपानचा संकल्प तुम्हाला थक्क करुन सोडेल. वर्तमानपत्राचा टाकाऊपासून टीकाऊच्या वापराचे भन्नाट तंत्रज्ञान जपानने तयार करुन जगाच्या पाठिवर आपणच सर्वश्रेष्ठ असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. वर्तमानपत्र वाचल्यानंतर त्याला रद्दीमध्ये फेकण्यापेक्षा त्यापासून नवीन वृक्षलागवडीचे तंत्रत्रज्ञान जपानने विकसित केले आहे.

‘द माइनिची शिम्बुंशा’ या प्रकाशनाने वर्तमान पत्राच्यावापरातून हिरवळ निर्माण करणाऱ्या रोपांची निर्मिती करण्यात येणार आहे. यासाठी एका विशिष्ट पेपरवर वर्तमानपत्र प्रकाशित केले जात असून वर्तमानपत्र पुरल्यानंतर त्यापासून वृक्षाची निर्मिती होईल, असा दावा प्रकाशनाने केला आहे.
या प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘ग्रीन’ वर्तमानपत्राच्या वापरानंतर विशिष्ट पद्धतीने तुकडे करुन वर्तमानपत्रापासून फुले देणाऱ्या रोपांची निर्मिती करणे शक्य होणार आहे. वर्तमानपत्राच्या जमिनीत पुरल्यानंतर योग्यप्रमाणात पाणी देऊन या रोपांपासून फुले मिळविता येणार आहेत. जपानमधील प्रसिद्द जाहिरात कंपनी ‘डेंट्सू इंक’ ने या संकल्पनेचा शोध लावला असून ‘द माइनिची शिम्बुंशा’ च्या सहकार्याने कंपनी ही नवी संकल्पना प्रत्येक्षात उतरविणार आहे.