जॉर्जियामध्ये एका चोरानं चक्क ७० लाख किंमतीचे न्यूडल्स चोरले आहेत. आता एवढे न्यूडल्स चोरून तो डोंगर रचणार आहे का? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. जॉर्जियामधील एका दुकानाबाहेर इन्स्टंट न्यूडल्सची पाकिटं लादलेला ट्रेलर ट्रक उभा होता. हा ट्रक घेऊन चोर पसार झाला आहे.

https://twitter.com/tnuthall/status/1029770878895251462

https://twitter.com/Reporterjamie/status/1029756449583517696

https://twitter.com/blurtnobrain/status/1029751830849499137

२५ जुलै ते १ ऑगस्ट या काळात येथे चोरीच्या अनेक घटना घडल्या. एक मोटरसायकल, पाच कार आणि न्यूडल्सच्या ट्रकची चोरी पाच दिवसांत झाली. चोरीला गेलेल्या ट्रकमध्ये जवळपास ३ लाख ३८ हजार न्यूडल्स पाकिटं होती. चोरानं एवढ्या न्यूडल्सची चोरी का केली आणि तो या चोरीच्या मालाचं करणार तरी काय असा प्रश्न आता पोलिसांना पडला आहे.