नवरात्रोत्सवाच्या अगदी पहिल्या दिवसापासूनच राज्यात मुसळधार पाऊस बरसत आहे. काही काळाची उसंत घेत त्याचे बसरणे सुरू आहेच पण पावसाने लोकांच्या उत्साहावर कितीही पाणी टाकण्याचा प्रयत्न केला तरी लोकांचा उत्साह कमी थोडाच होणार आहे ! याचे उदाहरण म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो. पाऊस पडत असला तरीही काही उत्साही महिला छत्री घेऊन गरबा खेळत आहेत.
नवरात्रीच्या नऊ दिवसांत ठिकठिकाणी गरब्याचे आयोजन केले जाते. तरुणी, महिला वर्ग अगदी उत्साहाने यात सहभागी होतात. काहीजणींची तर अगदी महिन्याभरापासून यासाठी तयारी सुरू असते. पण यंदा मात्र अगदी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासूनच पावसाचे विघ्न आहे. असे असले तरी महिलावर्गाचा उत्साह मात्र किंचितही कमी झालेला दिसत नाही. पाऊस बरसत असताना काही महिला या चक्क एका हातात छत्री पकडून गरबा खेळताना दिसत आहेत. पाऊसही उत्साहावर विरजण घालू शकत नाही असेच या फोटोतून दिसते आहे. व्हाट्स अॅप ग्रुपवर देखील हा फोटो व्हायरल झाला आहे. या गुजराती महिला असल्याचे समजते.