Anand Mahnidra on Odisha Train Accident: ओडिशातील रेल्वे अपघातानंतर देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. बालासोर येथील बहनागा बाजार स्टेशनजवळ तीन रेल्वेत झालेल्या विचित्र अपघातात २८८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर, ९०० हून अधिक जण गंभीर जखमी आहेत. जखमींवर ओडिशातील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.रेल्वेच्या झालेल्या अपघातामुळे अनेकांना जोरदार धक्का बसला आहे. त्यामुळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते देशातील अनेक दिग्गज नेत्यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केले आहे. दरम्यान यावर उद्योगपती आनंद महिंद्रांनी प्रतिक्रिया दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुर्घटनेनंतर आनंद महिंद्रा संतापले

आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. भविष्यात पुन्हा असे अपघात होऊ नयेत यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे असं आनंद महिंद्रा यांनी म्हटलं आहे. तसंच या दुर्घटनेसाठी कारणीभूत कारणांच्या मुळाशी गेलं पाहिजे असंही सांगितलं आहे. मानवी चूक असो किंवा तांत्रिक कारण, कोणत्याही परिस्थितीत अशी दुर्घटना व्हायला नको होती असं मत आनंद महिंद्रा यांनी मांडलं आहे. “ही दुर्घटना इतकी भीषण आहे की, संपूर्ण देशाने जीव गमावलेल्या स्मरणार्थ मूक चिंतन केलं पाहिजे. ओम शांती. आपण असे अपघात पुन्हा होऊ देऊ शकत नाही. या दुर्घटनेच्या मुळापर्यंत आपण पोहोचले पाहिजे. मानवी किंवा तांत्रिक चुका असोत, दोन्हीपैकी कोणतीही चूक अशी विध्वंस घडवणारी नसावी. रेल्वेच्या कामकाजातील अयशस्वी-सुरक्षित यंत्रणा पुन्हा एकदा पडताळण्याची गरज आहे,” असं आनंद महिंद्रा म्हणाले आहेत.

पाहा ट्विट –

हेही वाचा – अपघातामुळे रुळावरुन घसरलेली रेल्वे पुन्हा रुळावर कशी नेली जाते? पाहा Video

मृतांचा आकडा वाढला

ओडिशा रेल्वे अपघातात मृतांचा आकडा २८८ वर पोहोचला आहे. शुक्रवारी संध्याकाळी हा भीषण अपघात झाला. मालगाडीचा एक डब्बा पटरीवरुन उतरल्यानंतर मागून आलेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसने मालगाडीला धडक दिली. त्यानंतर आणखी बंगलुरु-हावडा एक्स्प्रेसने कोरोमंडला एक्स्प्रेला धडक दिली. या अपघातात रेल्वेचे डबे अक्षरश: विखुरले होते. मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी १० लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. ओडिशाच्या अपघाताची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल अशी घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Odisha anand mahindra on odisha train accident says we cannot let such accidents happen again we must get to the root cause of this tragedy srk
First published on: 04-06-2023 at 11:09 IST