राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी काँग्रेस खासदार रेणुका चौधरी यांना उपरोधिक टोला हाणला. त्यांनी रेणुका यांची तुलना  रामायणातील राक्षसी हास्याशी केली. राज्यसभेतील भाषणादरम्यान रेणुका या मोठ्या आवाजात हसत होत्या. त्यांना सभापती व्यंकय्या नायडू यांनी समज देत शांत राहण्याची सूचना केली. पण त्या मात्र शांत बसल्या नाहीत, उलट त्या हसतच होत्या. व्यंकय्या नायडू यांच्या सूचनेमध्ये हस्तक्षेप करत मोदींनी चौधरी यांना हसू देण्याची उपरोधिक विनंती केली.

‘रेणुका यांना तुम्ही रोखू नका अशी मी तुम्हाला विनंती करतो. कारण रामायणानंतर कैक वर्षांनी मी असं हसू ऐकलं आहे.’ असं उपरोधिक हिणवत त्यांनी रेणुका चौधरी यांना शांत केलं. मोदींच्या उपरोधिक टीकेनंतर रेणुका चौधरींच्या टीका जिव्हारी लागली. त्या त्वरीत शांत बसल्या. सकाळपासूनच सोशल मीडियावर हे प्रकरण गाजू लागल्यानं अनेकांनी राज्यसभेत घडलेल्या प्रसंगाची तुलना रामायणातील एका प्रसंगाशी केली आहे.

रावणाची बहिण शूर्पणखा वेश पालटून रामाच्या पर्णकुटीत आली. रामाशी विवाह करण्याची इच्छा तिने बोलून दाखवली, पण रामानं तिचा प्रस्ताव धुडकावल्यानंतर तिने आपलं मायवी रुप धारण करत सीतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला यावेळी लक्ष्मणानं सीतेचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न केला आणि यात शूर्पणखेचं नाक कापलं. रामायण मालिकेत हा प्रसंग आणि मोदींची टिका यात बरंच साम्य आहे असं सांगत अनेकांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या प्रसंगातील शूर्पणखाच्या राक्षशी हास्याची तुलना त्यांनी रेणुका यांच्या हास्याशी केली. इतकंच नाही तर मोदींच्या टिकेनंतर रेणुका यांनी राज्यसभेतील अवस्था ही नाक कापलेल्या शूर्पणखासारखीच झाली अशीही तुलना सोशल मीडियावर होऊ लागली. त्यामुळे सोशल मीडियावर संपूर्ण दिवसभर समिश्र प्रतिक्रीया पाहायला मिळत आहेत.

https://twitter.com/DrGPradhan/status/961240176369520640

https://twitter.com/theskindoctor13/status/961285588375785472