Pune Influencer Dirty Video : सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी इन्फ्लुएन्सर रोज काही ना काही प्रयोग करुन पाहत असतात. अनेकदा त्यांचे प्रयोग यशस्वी होतात, तर अनेकदा फसतात. पण फसलेल्या प्रयोगातूनही त्यांना सोशल मीडियावर चांगली प्रसिद्धी मिळते, मग ती नकारात्मक पद्धतीने का होईना… सोप्या भाषेत सांगायचं तर त्यांचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. काही इन्फ्लुएन्सर त्यांच्या व्हिडीओतून किचन, फॅशन, स्कीन केअरबाबत एकापेक्षा एक भन्नाट टिप्स देत असतात. अशाचप्रकारे पुण्यातील एक इन्फ्लुएन्सर तरुणी सोशल मीडियावर व्हिडीओंच्या माध्यमातून अनेक स्कीन केअर टिप्स देत असते. पण तिने एका व्हिडीओत डोळ्यांची काळजी कशी घ्यायची यासंदर्भात एक व्हिडीओ पोस्ट केलाय, ज्यात तिने एक अतिशय किळसवाणी आणि घाणेरडी टिप्स सांगितली आहे, जी पाहून तुमच्या तळ पायाची आग मस्तकात जाईल.

इन्फ्लुएन्सर तरुणीने या व्हिडीओत डोळे स्वच्छ करण्यासाठी अतिशय घाणेरडं कृत्य केलयं, ज्यामुळे सोशल मीडियावर लोक तिला चांगलचं ट्रोल करतायत. या व्हिडीओत तिने डोळे स्वच्छ करण्यासाठी चक्क स्वत:च्या लघवीचा वापर केलाय. यावर अनेक डॉक्टरही तीव्र संताप व्यक्त करतायत.

नुपूर पिट्टी असे या इन्फ्लुएन्सर तरुणीने नाव आहे, तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे, या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, तिने दोन छोट्या ग्लासमध्ये लघवी घेतली आहे, हे लघवीने भरलेले ग्लास तिने उचलले आणि डोळ्यांना लावले. लघवीच्या ग्लासात डोळे ४ ते ५ मिनिटे उघड झाप केले. यानंतर एका टॉवेलने डोळे पुसले आणि दोन्ही हात डोळ्यांवर ठेवले. या व्हिडीओत तिने डोळ्यांसाठी लघवीचे फायदेही सांगितले आहेत.

तिने व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये “लघवीने डोळे स्वच्छ करणे- नैसर्गिक औषध” असे म्हटले आहे. यामुळे डोळ्यांचा कोरडेपणा, जळजळ आणि लालसरपणा कमी होतो असेही तिने म्हटले आहे. तसेच हा नैसर्गिक आणि पर्यायी उपचार असल्याचे ती सांगतेय. तिचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. ज्यावर लोकही तीव्र संताप व्यक्त करतायत. अनेकांनी तिला त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेण्यास सांगितले आहे.

दरम्यान ट्रोलिंगनंतर इन्फ्लुएन्सर तरुणीने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरुन डिलीट केला, पण यकृत तज्ज्ञ डॉ. सिरियात अॅबी यांनी तो व्हिडीओ एक्सवर पोस्ट करत हा मुर्खपणा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, कृपया कोणीही अशाप्रकारे लघवी डोळ्यांमध्ये टाकू ना, लघवी निर्जंतुक नसते. या तरुणीने इन्स्टाग्रामवर कूल दिसण्यासाठी केलेला हा भयानक आणि निराशाजनक प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान अनेकांनी हा प्रकार खूपचं घाणेरडा आणि आरोग्यासाठी घातक असल्याचे म्हटले आहे. तर अनेकांनी सोशल मीडियावरील आरोग्यासंबंधीत कोणत्याही टिप्स फॉलो करण्यापूर्वी आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या असे आवाहन केले आहे.