रेल्वे प्रवासादरम्यान छातीमध्ये दुखू लागलं अन्...; RPF जवानाच्या प्रसंगावधानमुळे वाचले त्याचे प्राण | RPF jawan saves life by performing cpr on passenger suffering from heart attack photos went viral | Loksatta

रेल्वे प्रवासादरम्यान छातीमध्ये दुखू लागलं अन्…; RPF जवानाच्या प्रसंगावधानामुळे वाचले त्याचे प्राण

मथुरा रेल्वे स्थानकातील या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.

रेल्वे प्रवासादरम्यान छातीमध्ये दुखू लागलं अन्…; RPF जवानाच्या प्रसंगावधानामुळे वाचले त्याचे प्राण
(Photo : Social Media)

आजकाल सर्वत्र हार्ट अटॅकचे प्रमाण वाढले आहे. फक्त जेष्ठ व्यक्तीच नाही तर तरुण मंडळी देखील या आजाराचे शिकार होत आहेत. एखाद्या व्यक्तीला जर अचानक छातीत तीव्र वेदना सूरू झाल्या तर अशावेळी नेमकं काय करायचं हे सुचत नाही आणि हॉस्पिटलला नेण्यास जरा जरी उशीर झाला तर त्या व्यक्तीचा प्राण जाण्याची शक्यता असते. त्यामुळे काही सेकंदाच्या या अवधीमध्ये काहीही होऊ शकते. या प्रसंगाचा विचार केला तरी आपण काळजीत पडतो. असाच एक प्रसंग काही दिवसांपुर्वी मथुरा रेल्वे स्थानकावर घडला. या घटनेचे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. नेमकं काय घडलं जाणून घेऊया.

रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार, १ ऑक्टोबर २०२२ रोजी ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान हार्ट अटॅक आलेल्या एका प्रवाशाला मथुरा रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले. तेव्हा तिथे ड्युटीवर असणाऱ्या आरपीएफ जवानाने प्रसंगावधान दाखवत त्या प्रवाशाचा सीपीआर करून जीव वाचवला. त्यानंतर या प्रवाशाला दवाखान्यात नेण्यात आले.

आणखी वाचा : फ्रिज नसला तरी दूध नासण्याचं टेन्शन नाही! IAS अधिकाऱ्याने स्वतःच्या गावच्या घरातील भन्नाट जुगाडाचे फोटो केले शेअर

रेल्वे मंत्रालयाचे ट्वीट :

आरपीएफ जवानाच्या प्रसंगावधानामुळे या प्रवाशाचा जीव वाचला. अनेक जणांनी या ट्वीटवर कमेंट करत आरपीएफ जवानाचे कौतुक केले आहे. हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Guinness : जगातील सर्वात उंच पाळीव मांजराची गिनीज बुकमध्ये नोंद, पाहा व्हिडिओ..

संबंधित बातम्या

Optical Illusion: जादूगराचा ससा हरवलाय, तुम्ही त्याला शोधून द्याल का?
Viral Video: सिद्धार्थ शुक्लासारखा हुबेहूब दिसणारा आहे तरी कोण?
एकच नंबर! संधिवात असलेल्या कुत्र्यासाठी चक्क अशी लिफ्ट बनवली! VIRAL VIDEO एकदा पाहाच
‘झोमॅटो’ रिव्ह्यूमध्ये फूड पॉइजनिंगची तक्रार! ग्राहक आजारी पडल्याची पोस्ट Zomato नं हटवली अन्….
मस्क यांच्या ट्वीटरला सापडला पर्याय! नवं अ‍ॅप ठरतंय ट्वीपल्सचं ‘सेकेण्ड होम’; जाणून घ्या Mastodon बद्दल

व्हिडिओ

ताज्या बातम्या
क्रूर! पॉर्न पाहून अल्पवयीन मुलाचा १० वर्षीय मुलीवर बलात्कार; नंतर गळा आवळून खून
Mumbai Fire : गोरेगाव आयटी पार्कमागील जंगलात भीषण आग
राजधानी हादरली: दिल्लीत २.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
पुणे: द्रुतगती मार्गावर अपघात रोखण्यासाठी ‘सुरक्षा’ मोहीम; जनजागृतीसाठी २४ तास गस्त, प्रादेशिक परिवहन विभागाची १२ पथके
पुणे: सात हजार ३०० पेक्षा अधिक पदांसाठी ४ डिसेंबरला विभागीय महारोजगार मेळावा