शबाना आझमी या आपल्या अभिनयाबरोबर त्यांच्या परखड विचारांसाठीही ओळखल्या जातात. एखादा विषय खटकला की त्या खुलेपणाने व्यक्त होतात. त्यामुळे त्यांच्या अभिनयाबरोबरच त्यांच्या विचारांनी प्रभावित असलेला मोठा वर्ग आहे. त्यांनी मांडलेल्या विचारांवर त्यांचे चाहते खुलेपणाने व्यक्त होत असतात. पण यावेळी ट्विटरवर एक फोटो पोस्ट करताना शबाना यांच्याकडून नकळतपणे एक चूक घडली. त्यानंतर ट्विपल्सने त्यांची चांगलीच खिल्ली उडवली.

मंदीत नोकरी गमावणाऱ्या तरुणाने लंडनमध्ये सुरु केला वडापावचा व्यवसाय, वार्षिक उत्पन्न ऐकून तुम्ही व्हाल थक्क

मालिकेचा सेट नव्हे, हा तर आध्यात्मिक गुरूंच्या मुलीचा लग्नमंडप

त्याचं झालं असं की, शबाना आझमी यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला.’ इटलीमध्ये केतकीने आग्रहाखातर उपमा तयार केला आहे’ असं ट्विट करत शबाना यांनी ट्विटरवर पोह्यांचा फोटो शेअर केला. पण त्यांच्या ट्विटनंतर ट्विप्ल्स बुचकाळ्यात पडले. कारण, त्यांनी हा पदार्थ उपमा आहे असं म्हटलं असलं ते पोहे असल्याचं पाहताचक्षणी ट्विपल्सच्या नजरेतून सुटलं नाही. त्यामुळे त्यांची ‘उपमा’ चुकीची असल्याचं लोकांनी निदर्शनास आणून दिलं, आणि ते दाखवून देण्यासाठी त्यांनी जी सर्जनशीलता वापरली त्याची तोड नाही.

https://twitter.com/deepakkumar21/status/917355053345685506

https://twitter.com/AuntyNational/status/917354716681592832

https://twitter.com/ElGuruGyani/status/917371199507877889