भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची मुलगी साराने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर आपला एक फोटो पोस्ट केला. अभ्यासात हुशार असलेली सारा आपल्या लुक्समुळेही नेहमी चर्चेत असते. प्रदीर्घ कालावधीनंतर सोशल मीडियावर आलेल्या साराच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी चांगलीच पसंती दर्शवली. अनेकांनी साराच्या फोटोचं कौतुकही केलं. मात्र याच दिवशी भारतीय संघाचा युवा क्रिकेटपटू शुभमन गिल याने केलेल्या इन्स्टाग्राम पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे. सारा आणि शुभमन या दोघांनीही पोस्ट केलेल्या फोटोला I SPY अशी कॅप्शन दिली आहे.

याच दोन फोटोंमुळे सोशल मीडियावर नेटकऱ्यांमध्ये रंगली आहे चर्चा…

जाणून घ्या नेटकरी काय म्हणतायत…

काही दिवसांपूर्वी साराने आपल्या बाबांसाठी खास बीटाचे कबाब बनवले होते. सचिनने या डिशचं कौतुक करत, एका मिनीटात मी ही डिश फस्त केली असं म्हटलं होतं.