भारतात टॅलेंटेड लोकांची कमतरता नाही, इथे अनेक जुगाड लोक आहेत, जे आपल्या मेंदूचा वापर करून काहीतरी हटके तयार करतात जे सर्वांना आश्चर्यचकित करते आणि कधीकधी तुम्हाला हसण्यास भाग पाडते. अशाच एका जुगाडचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक जुगाक करून बनवलेली गाडी दिसत आहे. पाहताक्षणी ही एक स्कॉर्पिओ कार असल्याचे वाटते पण ती एक रिक्षा असल्याचे लक्षात येते. या जुगाडू गाडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोकांना हा जुगाड खूप आवडला आहे. व्हिडीओ पाहून लोकांनी विविध प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तीन चाकांची वाली स्कॉर्पिओ (jugaad viral video)
मनीष त्यागी नावाच्या युजरने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये एक विचित्र तीन चाकांची गाडी दिसत आहे. व्हिडिओमध्ये ती व्यक्ती या वाहनाचा मागील भाग साफ करताना दिसत आहे. ही गाडी मागून स्कॉर्पिओ सारखी दिसते, पण कॅमेराचा अँगल फिरवताच ती कारऐवजी एक ऑटो उभी असलेली दिसते. मागून पाहिले तर स्कॉर्पिओ लूक असलेली ही एक ऑटोरिक्षा आहे. हा व्हिडीओ पाहून सोशल मीडियावर लोक थक्क झाले आहे.

हेही वाचा – कसे बनवले जातात आपटी बॉम्ब? फटाका तयार करतानाचा व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “हे खूप धोकादायक आहे”

रिक्षाचे स्कॉर्पिओमध्ये रूपांतर

व्हिडिओला ६-५ लाखांहून अधिक लाईक्स आले आहेत आणि लोक मजेदार कमेंटस् करत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘स्कॉर्पिओ + ऑटो = स्कॉर्पिटो.’ तर दुसर्‍याने लिहिले, ‘नक्कीच त्याच्या सासऱ्यांकडून ही भेट मिळाली आहे.’ आणखी एकाने लिहिले, ‘कदाचित याला स्कोरिक्षा म्हणावे.’ तर दुसर्‍याने लिहिले, ‘लक्झरी ऑटो, अप्रतिम

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Some say scorpito and some say scoriksha the person made a rickshaw scorpio look viral video snk