आई-बाबांकडून पैसे मागण्यासाठी अनेकदा तरुण मंडळी खोटं बोलतात किंवा मग गोड-गोड बोलून, हट्ट करून जी गोष्ट हवी आहे ती हक्काने मागून घेतात. तसेच आई-बाबांनी पैसे दिल्यावर १०० रुपये का होईना एक्स्ट्रा मागताना दिसतात. तर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत आहे, यात पैसे मागण्यासाठी एका मुलाने अनोखी युक्ती शोधून काढली आहे. एक तरुण आपल्या बाबांना सोशल मीडिया ॲपवर संदेश पाठवतो आणि पैशांची मागणी करतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉक्टर मनीष कुमार यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी आपल्या मुलाबरोबरचा मजेशीर संवाद पोस्ट केला आहे. सोशल मीडिया ॲप व्हाट्सॲपवर डॉक्टरांचा मुलगा त्यांना संदेश पाठवतो. तर त्यात लिहिलेलं असते की, प्रिय वडील, मला आशा आहे की, तुमची तब्येत ठीक असेल. मी हा संदेश तुम्हाला कळवण्यासाठी लिहित आहे की, माझ्याकडचे पैसे संपले आहेत आणि मी काही आर्थिक मदतीसाठी तुम्हाला मेसेज केला आहे. तुमचा प्रिय मुलगा रेक्स… कृपया ७७२ रुपये एक्स्ट्रा पाठवा…, असा मजेशीर मेसेज तरुणाने बाबांना केला आहे.

हेही वाचा…हीच खरी शेतकऱ्याची वाघीन… म्हशीची प्रसुती करणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ होतोय व्हायरल

पोस्ट नक्की बघा :

आपल्या मुलाने पाठवलेला मजेशीर मेसेज पाहून त्यांनी या संवादाचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. त्यात तुम्हाला तरुणाने पाठवलेला मेसेज आणि त्यावर डॉक्टर मनीष कुमार यांनी दिलेल्या रिॲक्शनदेखील अगदीच मजेशीर आहे. अगदीच एका पत्राप्रमाणे मेसेज तरुणाने त्याच्या वडिलांना पाठवला आणि पैशांची मागणी केली. त्यावर वडिलांनीदेखील हे काय आहे? असा का मेसेज केला आहेस? असे मजेशीर पद्धतीत विचारताना दिसले.

सोशल मीडियावर ही पोस्ट डॉक्टर मनीष कुमार यांच्या @drmanishranchi एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. त्यात बाबा आणि तरुण यांचा संवाद तुम्ही बघू शकता. ही पोस्ट पाहून अनेकांना तरुणाची ही स्टाईल आवडली आहे. तसेच काही जण आपल्या मुलांबरोबर घडलेले असे किस्से कमेंटमध्ये सांगताना दिसले आहे आणि सोशल मीडियावर या पोस्टने अनेकांचं लक्ष वेधून घेतले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son messages his father on a social media app and demands money asp