नुकतात ‘वर्ल्ड इमोजी डे’ पार पडला. हल्ली शब्दांपेक्षा इमोजींच्या माध्यमातून आपण अधिक चांगल्या रितीने व्यक्त होतो. आपल्या संवादांची पद्धत हळूहळू बदलत चाललीय आणि भावभावना व्यक्त करण्यासाठी आपण इमोजींचा वापर जास्त करू लागलोय. त्यातून स्मायली इमोजीचा वापर तर आपल्या मेसेजमध्ये असोतच असतो. हे इमोजी २१ व्या शतकात आलेत असं तुम्हाला वाटत असेल तर हा आपला गैरसमज असू शकतो. कारण तुर्कीमध्ये इसवीसनपूर्व १७०० मधलं एक मातीचं भांड पुरातत्त्व विभागाला सापडलंय. या मातीच्या भांड्यावर स्मायली फेस असणाऱ्या इमोजीचं चित्र आहे.
पांढऱ्या रंगाचं मातीचं भांडं असून त्यावर काळ्या रंगात स्मायली फेसचं चित्र काढलेलं होतं. या भांड्याचा वापर कदाचित सरबत किंवा इतर पेय ठेवण्यासाठी केला जात असावा असा अंदाज बांधला जात आहे. तेव्हा स्मायली इमोजी हा जगातला सगळ्यात जूना इमोजी असल्याचं म्हटलं जात आहे. सध्या हे मातीचं भांड प्रदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे. १९९९ मध्ये पहिल्यांदा इमोजी तयार करण्यात आले होते. ‘इ’ म्हणजे पिक्चर आणि ‘मोजी’ म्हणजे कॅरेक्टर यावरून ‘इमोजी’ हा शब्द तयार करण्यात आला. सध्या ७२२ प्रकारच्या इमोजी वापरल्या जात आहेत.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन करतात रक्ताने आंघोळ?