आज धनत्रयोदशी आहे. आज सोन्या चांदीच्या वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. काही जण दागिन्यांऐवजी घरात नवीन भांडे देखील विकत घेतात. आज संध्याकाळचा मुहूर्त हा वस्तू खरेदीसाठी योग्य आहे, त्यामुळे सोने, चांदीच्या दागिन्यांबरोबरच अनेक जण नवनव्या वस्तू खरेदी करतात. पण आजही काही ठिकाणी धनत्रयोदशीला काही वस्तूंची खरेदी टाळली जाते. या वस्तू खरेदी करणे शुभ नसल्याचे मानले जाते.
लोखंड आणि स्टीलची भांडी- धनत्रयोदशीला लोखंडाच्या वस्तू खरेदी करणे अशुभ मानले जाते. या दिवशी सोने- चांदीच्या दागिन्यांसोबत घरात एक नवे भांडे खरेदी करण्याचीही प्रथा आहे त्यामुळे अनेकजण स्टीलची भांडी घेतात. पण स्टीलची भांडी घेण्याऐवजी तांब्याची भांडी घेणे योग्य ठरते.
धारधार वस्तू – कैची, सुरी यांसारख्या वस्तूंची खरेदी करणे देखील अनेक ठिकाणी अशुभ मानले जाते.
काचेच्या वस्तू – या दिवशी काचेच्या वस्तूही विकत घेणे अनेक जण टाळतात. धनत्रयोदशीचा दिवस हा नवीन वस्तू खरेदीसाठी शुभ मानला जातो. प्रत्येक जण आपापल्या परीने काहीतरी नवीन विकत घेण्याचा प्रयत्न करतो. पण अनेक ठिकाणी मात्र या लोखंड, स्टील, काचेच्या वस्तू विकत घेणे सर्रास टाळले जाते.
संग्रहित लेख, दिनांक 28th Oct 2016 रोजी प्रकाशित
Dhanteras 2016 : धनत्रयोदशीला ‘या’ वस्तूंची खरेदी करत नाही
आज सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याची प्रथा आहे
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 28-10-2016 at 19:27 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Things you should not buy on dhanteras