१३ हजार फूटांवरून खाली उडी मारण्याचा स्टंट करताना कोणीही अगदी १०० वेळा विचार करेल पण एका ९५ वर्षांच्या आजींनी मात्र १३ हजार फूटांवरून उडी मारून तूफानी स्टंट करण्याचा आनंद लुटला आहे. आजींची ही उमेद अगदी भल्याभल्यांनाही लाजवेल. या आजींचा फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
आपल्या ९५ व्या वाढदिवसादिवशी बेट्टी यांना काहीतरी भन्नाट करायचे होते. त्यामुळे वाढदिवसांचा दिवशी आपल्या नातवडांना घेऊन त्यांनी स्टंट करण्याचे ठरवले. आपल्याला ही प्रेरणा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्याकडून मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे आपल्या नातवंडासोबत त्यांनी १३ हजार फूटांवरुन विमानातून उडी मारण्याचा स्टंट केला. तसे त्यांच्या सोबत प्रशिक्षित स्काय ड्रायव्हर देखील होते. पण वाढदिवसाच्या दिवशी त्यांना जगण्याचा भरभरून आनंद घ्यायचा होता. १३ हजार फूटांवरून सुरक्षित खाली आल्यानंतर बेट्टी यांचे नातेवाईक केक घेऊन त्यांची वाट पाहत होते. त्यानंतर सगळ्यांनी केक कापून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या ८५व्या वाढदिवशी देखील बेट्टी यांनी पॅराशूटमधून सफर केली होती. उतारवयात अनेक जण प्रकृतीच्या समस्येमुळे त्रस्त असतात पण अशी कोणतीही कुरकुर न करता जीवनाचा आनंद घेण्याची प्रेरणा बेट्टी यांनी सगळ्यांना दिली.
संग्रहित लेख, दिनांक 13th Oct 2016 रोजी प्रकाशित
९५ व्या वाढदिवसादिवशी आजींचा तूफानी स्टंट
१३ हजार फूटांवरून विमानातून खाली उडी मारली
Written by लोकसत्ता टीम
Updated:

First published on: 13-10-2016 at 19:19 IST
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This grandma jumping out of a plane on her 95th birthday