बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, असं म्हणतात, आता हा फोटो पाहिल्यावर ‘हा मुलगा हिरोच होईल’ असं कोणी म्हटलं तर आश्चर्य वाटायला नको. बरं हा झाला गंमतीचा भाग, सध्या सोशल मीडियावर या ‘स्मार्ट बेबी’चा फोटो तुफान व्हायरल होत आहे. आता आयुष्यभर एवढं चांगलं काम करूनही काहींना प्रसिद्धी मिळत नाही तितकी  प्रसिद्धी या चिमुकल्याला जन्मत: मिळतेय. त्याला कारणही तसंच आहे म्हणा. आता नवजात बालक एकतर डोळे मिटून शांत तरी असतं किंवा बिचारं जिवाच्या आकांताने रडत तरी असतं, पण हा चिमुकला मात्र उशाखाली हातांची घडी घालून एकदम ऐटीत झोपला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका चिमुकल्याला यापूर्वी कोणी असं नक्कीच पाहिलं नसेल. तेव्हा ‘बॉस’ सारख्या ऐटीत बसलेल्या मुलाला पाहून सोशल मीडियावर त्याच्यावर एकापेक्षा एक जोक्स व्हायरल होत आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर अशाच एका छोट्या मुलाने सगळ्यांना वेड लावलं होतं. हे नवजात बालक चक्क जन्मत: चालू लागलं होतं. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर त्याची ही करामत पाहून सगळ्यांनी आश्चर्याने चक्क तोंडात बोटं घातली होती.

https://twitter.com/FarziCricketer/status/874169266874011650

https://twitter.com/GadhviLaxman/status/873815436256739328

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: This newborn baby is now become online sensation