Fact Check: विक्रमी लसीकरण झाल्याने मोबाईल नेटवर्क कंपन्यांकडून तीन महिन्यांचा फ्री रिचार्ज!; जाणून घ्या व्हायरल मॅसेजमागील सत्य

सोशल मीडियावर अनेक संदेश सत्यता न पडताळता व्हायरल होत असतात. काहीजण खोडसाळपणा करत मॅसेज पोस्ट करतात.

Mobile_Network_Viral_Message
विक्रमी लसीकरण झाल्याने मोबाईल नेटवर्क कंपन्यांकडून तीन महिन्यांचा फ्री रिचार्ज!; जाणून घ्या व्हायरल मॅसेजमागील सत्य (प्रातिनिधिक फोटो)

सोशल मीडियावर अनेक संदेश सत्यता न पडताळता व्हायरल होत असतात. काहीजण खोडसाळपणा करत मॅसेज पोस्ट करतात. त्यानंतर त्यावर विश्वास ठेवत अनेक जण एकमेकांना मॅसेज फॉरवर्ड करतात. असाच एक मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. भारतात विक्रमी लसीकरण झाल्याने जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया युजर्संना तीन महिन्यांपर्यंत रिचार्ज मोफत मिळत आहे, असा दावा करण्यात आला आहे. यावर एक लिंक दिली असून त्यावर क्लिक करण्यास सांगितलं आहे. मात्र खोट्या बातमीतील भूलथापांना बळी पडलात तर तुम्हाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

व्हॉट्सअॅपवर एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यात लिहिले आहे- देशात विक्रमी लसीकरण झाल्याच्या आनंदात सर्व भारतीय वापरकर्त्यांना ३ महिन्यांचे रिचार्ज मोफत दिले जात आहे. तुमच्याकडे Jio, Airtel किंवा Vi सिम असल्यास तुम्ही या ऑफरचा लाभ घेऊ शकता. यामध्ये पुढे एक नोट देऊन लिहिले आहे की खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुमचे फ्री रिचार्ज मिळवा. यानंतर एक लिंक दिली आहे. यामध्ये ऑफरची मुदत संपण्याची तारीख २० जानेवारी देण्यात आली असून लोकांना लवकर संधीचा फायदा घेण्यास सांगितलं आहे.

Viral: अचानक सिंहासमोर आला कुत्रा, मात्र यावेळी घडलं भलतंच; व्हिडिओ पाहून तुम्हालाही बसेल आश्चर्याचा धक्का

या लिंकवर क्लिक केल्यानंतर एक बनावट वेबसाइट उघडते. यामध्ये काही लोकांच्या कमेंट्सही दाखवल्या आहेत. या सर्व फेसबुक कमेंट्ससारख्या वाटतात ज्या टिप्पण्यांमध्ये रिचार्ज मिळवण्याबद्दल बोलतात. ते फेसबुक युजर्स नसून ही वेबसाइट अशा प्रकारे तयार करण्यात आली आहे की हे लोक फेसबुक वापरकर्त्यांसारखे दिसतात. यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर देण्यास सांगितले आहे. यानंतर, तुम्हाला व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शेअर करण्यास सांगितले जाते. स्कॅमर नंतर तुमचा मोबाईल नंबर पुढे विकतात आणि तुम्हाला स्पॅम कॉल मिळू लागतात. यामुळे तुम्हाला अशा कोणत्याही बनावट लिंकपासून सावध राहण्याची गरज आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three month free mobile charge viral message fact check rmt

Next Story
“भारतीयांनी Anocracy हा शब्द शिकून घ्यावा”; म्हणत थरुर यांचा भाजपाला टोला; पण अ‍ॅनॉक्रॉसीचा अर्थ काय?
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी