Tiger Attack On Car Viral Video: रानवनात भटकणारे हिंस्र प्राणी रस्त्यावर जेव्हा येतात, त्यावेळी सर्वांचीच पळता भुई झाल्याशिवाय राहत नाही. बिबट्या, सिंह, वाघासारखे खतरनाक प्राणी शिकारीच्या शोधात मुक्त संचार करत असतात. मानवी वस्तीतही या वन्य प्राण्यांचा वावर वाढल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडीओंच्या माध्यमातून समोर आलं आहे. वाघसारखा प्राणी समोर दिसल्यावर भल्या भल्यांच्या अंगावर काट येतो. रस्त्यावरून प्रवास करताना अचानक वाघ समोर दिसल्यावर थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. असाच एक धक्कदायक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. भर रस्त्यात एका वाघाने कारवर हल्ला केल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. वाघाने दाताने कार खेचून पाठीमागे नेली, त्यानंतर जे घडलं ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कारवर वाघाने हल्ला चढवला अन् त्यानंतर घडला धक्कादायक प्रकार, पाहा व्हिडीओ

@tigers_r_ours नावाच्या युजरने वाघाचा हा थरारक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. एका रस्त्यावरून जाणाऱ्या कारवर या वाघाने हल्ला केल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एव्हढी मोठी कार त्या वाघाने चक्क दातानेच ओढल्याचं व्हिडीओत दिसत आहे. वाघाच्या हल्ल्यात प्राण्यांसह माणसांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे जंगलात फिरताना, रस्त्यावरून जात असताना हिंस्र प्राण्यांपासून चार हात लांब राहण्याचं आणि सावधानता बाळगण्याचं आवाहन वन विभागाकडून नेहमीच केलं जात. हा थरारक व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. तसंच या व्हिडीओला हजारोंच्या संख्येत व्यूज मिळाले असून शेकडो नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ लाईकही केला आहे.

नक्की वाचा – किंग कोब्रासोबत खेळायला लागला… काही सेकंदातच कोब्राने खेळ खल्लास केला, Video पाहून थरकाप उडेल

वाघाचा तो व्हिडीओही इंटरनेटवर झाला तुफान व्हायरल

वाघाने हत्तीवर बसलेल्या माहुतावर जीवघेणा हल्ला केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. हत्तीला आणि माहुताला पाहताच वाघ वाऱ्याच्या वेगासारखा धावत सुटला आणि त्या माहुतावर पंजा मारला, ही सर्व थरारक दृष्य कॅमेरात कैद झाली होती. अनेकांच्या अंगावर शहारा आणणारा या व्हिडीओत काही जण हत्तीवर बसून जंगल सफारी करताना दिसत आहेत. याचदरम्यान एक वाघ शेतातील गवतातून भरधाव वेगानं हत्तीच्या दिशेनं येताना दिसतो. हा वाघ हत्तीवर बसलेल्या माहुताची शिकार करण्यासाठी मोठी झेप घेतो. वाघ पंजा मारत असताना माहुत काठीच्या सहाय्याने वाघाला पळवून लावण्याचा प्रयत्न करत असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. मात्र, त्याचवेळी वाघ उंच झेप घेऊन माहुतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो. वाघाने केलेला हा खतरनाक हल्ला कॅमेराबद्ध झाल्याने व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला.

इथे पाहा व्हिडीओ

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger attack on car while travelling on highway road watch tigers shocking viral video on instagram nss