“चीते की चाल… बाज की नजर…..और बाजीराव की तलवार पर कभी संदेह नहीं करते” हा डायलॉग तुम्ही ऐकला असेल. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो पाहून तुम्ही “बाघ की नजर पर कभी संदेह नहीं करते!”असंच म्हणाल. होय. या व्हिडीओमध्ये एक वाघ त्याची शिकार बाजुलाच असूनही पुर्णपणे दुर्लक्षित करतोय. हे पाहून सारेच जण आश्चर्य चकित होऊ लागले आहेत. नक्की असं काय घडलं असेल की शिकार बाजुला असूनही वाघ मात्र शिकार न करताच तिथून निघून गेला, असा प्रश्न साऱ्यांना पडू लागला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक वाघ आनंदाने स्वतःच्याच धुंदीत फिरताना दिसत आहे, तर काही अंतरावरच दोन हरणे त्याच्या मागे उभे असलेले दिसत आहेत. वाघ आपल्या शिकारकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे निघून जाताना दिसतोय. वाघाच्या मागे दोन हरणे होते जी आधी त्याच्याकडे बघत होती आणि त्याला पुढे गेलेलं पाहून हलक्या पावलांनी तिथून पळून जातात. हे पाहून कदाचित तुमचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. कारण वाघ त्याची शिकार कधीच सोडत नाही आणि काही सेकंदात शिकार फस्त करून मोकळा होतो. पण हा व्हिडीओ काहीसा वेगळा आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ४५ वर्षांनंतर आपल्या आजीला भेटायला गेला हा माणूस; पुढे जे घडतं ते पाहून भावूक व्हाल!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर तरूणांनी केला गरबा डान्स; आनंद महिंद्रा म्हणाले, “गुजरातमधून माझा विरोध…

हा व्हिडीओ भारतीय वन सेवेचे अधिकारी रमेश पांडे यांनी शेअर केला आहे. “वाघ त्यांच्या शिकारीला मारण्यात खरोखर किफायतशीर असतात. ते फक्त मारण्यासाठी शिकार करत नाहीत.” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ लोकांना फार आवडला असून तो आतापर्यंत १ लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओवर लोकांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या. एका यूजरने लिहिले की, “एका वन्यजीव व्यक्तीकडून असे ऐकले आहे की वाघ साधारणपणे आठवड्यातून एकदा शिकार करतो आणि इतर वेळेला तो शिकार करत नाही! आठवड्यातून एकदाच शिकार करून ते समाधानी होतात! आणि वाघ सहसा रात्री शिकार करतो. “दिवसा शिकार करत नाहीत! दिवसा वाघ चांगले झोपतात! वाघ देखील बुद्धिमान असतात!” दुसर्‍या यूजरने कमेंट करत सांगितलं की, “पर्यावरणीय संतुलन राखणं त्यांना मानवांपेक्षा चांगलं माहित आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tiger ignores two deer walking behind started going without hunting see what happened next in viral video prp