Ukranian women shares experience with Indian wedding effects: लग्न ही अशी गोष्ट आहे, जी पुरूष आणि महिला या दोघांचंही आयुष्य मोठ्या प्रमाणात बदलवून टाकते. यातही महिलेच्या आयुष्यावर सगळ्यात जास्त प्रभाव पडतो. अशात अगदी दुसऱ्या देशातील व्यक्तीशी लग्न केले तर केवळ भाषा, संस्कृतीच नाही तर बऱ्याच गोष्टींमध्ये जुळवून घ्यावे लागते. अशाच एका महिलेने तिचे वैयक्तिक दैनंदिन आयुष्य कसे बदलले आहे याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
भारतीय पुरूषाशी लग्न केल्यानंतर आठ वर्षांहून अधिक काळ भारतात राहिलेल्या विक्टोरिया चक्रवर्ती या युक्रेनियन महिलेने तिचे दैनंदिन जीवन कसे बदलले आहे याबाबत सांगितले आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये तिने भारतीय रितींशी जुळवून घेतल्याने तिच्या दैनंदिनीमध्ये नवीन बदल कसे घडले आणि त्याचा काय परिणाम झाला हे सांगितले आहे.
साडी ही आयुष्याचा महत्त्वाचा भाग
व्हिक्टोरियाने सांगितले की, भारतीय पोशाख तिच्या आयुष्याचा एक नैसर्गिक भाग बनला आहे. साडी हळूहळू माझ्या वॉर्डरोबचा प्रमुख भाग झाली. मी त्याशिवाय लग्न किंवा इतर कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची कल्पनाही करू शकत नाही, असे तिने म्हटले आहे.
भारतीय पद्धतीच्या जेवणाच्या सवयी
सध्या कसे जेवणे आवडते याबाबत बोलताना व्हिक्टोरिया म्हणते की, “पारंपरिक अन्न हाताने खाणं हे नैसर्गिक वाटतं”.
सण, आनंद आणि नातेसंबंध
व्हिक्टोरियासाठी भारतात राहण्याचा सर्वात आवडता अनुभव म्हणजे सण. सण हे वर्षातील माझ्या सर्वात आवडत्या दिवसांपैकी प्रमुख भाग आहेत. रंग, दिवे आणि उत्सव मला नेहमीच घरी असल्याची भावना देते असे ती म्हणाली.
व्हिक्टोरियाच्या प्रवासाबाबत नेटिझन्सच्या प्रतिक्रिया
व्हिक्टोरियाच्या या व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. एका युक्रेनियन महिलेने भारतीय परंपरा कशा स्वीकारल्या आहेत याचं कौतुक नेटिझन्सनी केलं आहे. “तू भारतीय पोशाखात इतरांपेक्षा सुंदर आणि चांगली दिसतेस”, अशा प्रतिक्रिया तिला दिल्या आहेत. काहींनी “तुम्ही हे स्वीकारले आहे आणि त्याचा आनंद घेत आहात हे पाहून आम्हाला खूप आनंद झाला”, असे म्हटले आहे.