Video Junior NTR Accent At Golden Globe: लॉस एंजेलिसमध्ये ८०व्या गोल्डन ग्लोब पुरस्कार विजेत्यांची घोषणा झाली. आणि जगभरात पुन्हा एकदा एस. एस. राजामौलींच्या ‘आरआरआर’चा डंका वाजला. गोल्डन ग्लोब पुरस्कारांसाठी ‘बेस्ट ओरिजिनल साँग’ आणि ‘बेस्ट नॉन इंग्लिश लँग्वेज फिल्म’ अशा दोन विभागात ‘आरआरआर’ चित्रपटाला नामांकन मिळाले होते. त्यापैकी RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याने ‘बेस्ट ओरिजिनल साँग’ पुरस्कार आपल्या नावे केला आणि भारताला पहिल्यांदा गोल्डन ग्लोब पुरस्काराची सलामी दिली. हा क्षण सर्वांसाठीच खास होता. नाटू नाटू गाण्यात ज्युनिअर एनटीआर चांगलाच भाव खाऊन गेला होता, पण तुम्हाला माहित आहे का गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यातही ज्युनिअर एनटीआरची चांगलीच हवा झाली. त्याचं डॅशिंग ड्रेसिंग नव्हे तर यावेळी त्याचा अॅक्सेन्ट ऐकूनच सगळे थक्क झाले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

असं म्हणतात कुणीही भारतीय जेव्हा परदेशी जाऊन येतो तेव्हा त्याचा अॅक्सेन्ट अचानक बदलतो. असाच काहीसा प्रकार ज्युनिअर एनटीआरच्या बाबतही घडला. ग्लोब्स रेड कार्पेटवर टीमसह मीडियाच्या काही प्रश्नांची उत्तरे देताना ज्युनिअर एनटीआरचा ब्रिटिश Accent वेगळाच भाव खाऊन गेला. त्याच्या भारतीय मित्रांनी, चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याची यावरून थोडी गंमत केली असली तरी या Accent मुळे त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं हे ही खरं आहे.

या Accent वरून अनेकांना अनिल कपूरची आठवण सुद्धा आली. “एनटीआरने त्याच्या आतल्या अनिल कपूरला बाहेर काढले आहे, अरे ऑस्करच्या आवृत्तीची वाट पाहत आहोत,” अशा कमेंट अनेकांनी केल्या तर भारतात हा Accent कधी ऐकला नाही तिकडे जाऊन काय झालं असेही प्रश्न काही चाहत्यांनी केले.

ज्युनिअर एनटीआरचा Accent ऐकला का?

हे ही वाचा<< विश्लेषण : ‘नाटू नाटू’च्या सुरांनी भारतासाठी पहिलेवहिले ‘गोल्डन ग्लोब’ कसे जिंकले?

दरम्यान, एकीकडे ‘अर्जेंटिना, १९८५’ या चित्रपटाने ‘बेस्ट नॉन इंग्लिश लँग्वेज फिल्म’ पुरस्कार जिंकला आणि या विभागातील ‘आरआरआर’ची संधी हुकली. यावर ज्युनियर एनटीआर म्हणाला, “राजामौलीचा ट्रॅक रेकॉर्ड लक्षात घेऊन, आम्हाला नक्कीच वाटले की आम्हीच जिंकणार आहोत. पण आज जे इथे घडलं ते जिंकण्यापेक्षाही अधिक आहे, अशी अपेक्षा आम्ही केली नव्हती”ज्युनिअर एनटीआरने मार्वल चित्रपटात काम करण्याची इच्छा सुद्धा व्यक्त केली.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video junior ntr accent at golden globe goes viral after natu natu got best original song award see reactions svs