Viral Video : महाराष्ट्राला वारीची सर्वात सुंदर परंपरा लाभली आहे. दरवर्षी लाखो विठ्ठल भक्त वारीद्वारे पायी पंढरपूरच्या दिशेने निघतात आणि आषाढी एकादशीला पोहचतात. आता विठ्ठलाच्या दर्शनानंतर हे वारकरी परतीच्या वाटेवर निघाले. काही वारकरी तर सुखरूप घरी पोहचले आहे. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आजी व आजोबा पंढरपूर यात्रेवरुन घरी आलेले दिसत आहे. ते घरी आल्यावर नातीला कसा आनंद झाला आहे, हे या व्हिडीओतून दिसत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक आज्जी दिसेल. तिच्या समोर कपडे आणि काही पिशव्या ठेवलेल्या दिसत आहेत. ती पंढरपूरवरून घरी परत आली आहे. व्हिडीओत तुम्हाला एक चिमुकली दिसेल. तिच्या हातात आज्जीने तिच्यासाठी आणलेला सुंदर फ्रॉक आहे. ती हा फ्रॉक पाहून एवढी आनंदी होते की जागेवरच उड्या मारताना दिसते आणि उत्साहात म्हणते, “माझ्या आईने झगा..” तिचा आनंद गगनात मावेनासा असतो. हा व्हिडीओ पाहून काही लोकांच्या त्यांच्या बालपणीचे दिवस आठवेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
ishu_samrudhi_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आजी व आजोबा पंढरपूर यात्रेवरून घरी आल्यावर नातीचा आनंद” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “किती आनंदी आनंद आहे या झोपडीत माझ्या” तर एका युजरने लिहिलेय, “मला पण खूप आनंद होयाचा लहानपणी जेव्हा आई बांगडया, माळ घेऊन यायची आणि तो प्रसाद, बुक्का, अस्थीगंध घेऊन सगळ्या घरात वाटायला जायचं” आणखी एका युजरने लिहिलेय, ” तर एका युजरने लिहिलेय, “हा आनंद म्हणजेच पाडुरंग परमात्मा” आणखी एका युजरने लिहिलेय, “रुखुमाईला खूप आनंद झाला वारी संपन्न झाली माऊली तुमची” एक युजर लिहितो, “माझी आज्जी नोव्हेंबरमध्ये वारली.. ती पण पंढरपूरला जायची. तिकडून आली की खूप आनंद व्हायचा. आता फक्त आठवणी राहिल्या.”