Viral Video : आयुष्य हे एकदाच मिळते त्यामुळे आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घेणे गरजेचे आहे. जे लोक मृत्यूशी संघर्ष करतात किंवा लढतात त्यांनाच आयुष्याची खरी किंमत कळते. तसेच जवळच्या लोकांना मृत्यूशी लढणाऱ्या व्यक्तीचे महत्त्व कळते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या असाच एक भावनिक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ब्लड कॅन्सरशी संघर्ष करून एक तरुण तब्बल एका वर्षानंतर घरी परतला आहे. हा कॅन्सर रुग्ण सुखरूप घरी परतल्याने घरातील सदस्यांचा आनंद गगनात मावेनासा झालाय. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण दिसेल. हा तरुण घरी परतला आहे आणि घरच्यांचा आशीर्वाद घेत आहे. तसेच काही जणांना भावुक होऊन मिठी मारत आहे. या तरुणाला पाहून सर्व जण खूप भावुक झाले आहे. प्रत्येकाचे डोळे पाणावले आहे. तुम्हाला वाटेल हा तरुण कुठून आला? तर हा तरुण मृत्यूशी संघर्ष करून एका वर्षानंतर हॉस्पिटलमधून परत आला आहे. त्याला ब्लड कॅन्सर होता. त्याने ब्लड कॅन्सरवर मात केली आहे. त्याच्या आगमनाने घरातील मंडळी आनंदी झालेली दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक तरुण फटाके सुद्धा फोडत आहे. घरचे मंडळी त्याला ओवाळून त्याचे जल्लोषात स्वागत करताना दिसत आहे. त्याच्यासाठी फुलांनी घर सजवले आहे. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की त्याला मोबाईल गिफ्ट केला आहे. तसेच त्याच्या येण्याच्या आनंदात केक सुद्धा कापला आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

ganeshgkrajput या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “ब्लड कॅन्सरशी संघर्ष करून एका वर्षानंतर हीरो घरी परतला.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “माणूस प्रत्येक संकटाशी लढा देऊ शकतो जेव्हा त्याचे कुटुंब त्यांच्या सोबत असतात” तर एका युजरने लिहिलेय, “आपणास निरोगी आणि उदंड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना” आणखी एका युजरने लिहिलेय, “भाऊ नशीबवान आहेस. एवढं प्रेमळ कुटुंब भेटलं आहे आपणास. आपले कुटुंब जर आपल्या बरोबर असेल ना तर आपण हजार संकटावर माणूस मात करू शकतो” एक युजर लिहितो, “देवा सुखी ठेव रे भावाला” तर एक युजर लिहितो, “देव तारी त्याला कोण मारी” अनेक युजर्सनी भावुक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of a young boy returned home by struggling with death and beat on blood cancer family warm welcomed him ndj