Viral Video : आई आणि मुलाचे नाते हे जगावेगळे आहे. आई नऊ महिने मुलाला पोटात ठेवते. निसर्गाने आईला वेदना सहन करण्याची अनोखी शक्ती दिली आहे. प्रसुती दरम्यानच्या वेदना या असह्य असतात. या वेदना पाहून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पत्नीच्या प्रसुती वेदना पाहून नवऱ्याला अश्रु आवरत नाही आणि तो भावुक होऊन ढसा ढसा रडायला लागतो. पती पत्नीच्या नात्यातील गोडवा आणि प्रेम दाखवणारा हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला प्रसुती साठी एका महिलेला हॉस्पिटलमध्ये आणले आहे. ती बेडवर झोपली आहे आणि पतीचा हात हातात घेऊन ती रडताना दिसत आहे. कदाचित तिला वेदना होत असतील तेव्हा तिचा पती तिला धीर देतो पण बाहेर येऊन तोच ढसा ढसा रडतो तेव्हा आई त्याला समजावून सांगते. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की प्रसुतीनंतर या पत्नी गोंडस बाळाला जन्म देते. या बाळाला पाहून सर्व जण आनंदी दिसतात. हा व्हिडीओ पाहून काही लोकांना त्यांच्या बाळाच्या जन्माच्या वेळची आठवण येईल तर काही लोक भावुक होतील. या व्हिडीओवर लिहिलेय, “चांगले आयुष्य जगायला पैसा नाही तर चांगला जोडीदार असायला पाहिजे”
पती पत्नीचे नाते हे अत्यंत पवित्र नाते मानले जाते. दोन व्यक्ती एकत्र येऊन नव्या आयुष्याची सुरुवात करतात. एकमेकांच्या सुख दु:खात एकमेकांबरोबर कायम राहतात. एकमेकांना समजून घेतात. जोडीदार कसा असावा, हे तुम्हाला या व्हिडीओतून समजेल.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

smile__batra या इन्स्टाग्राम अकाउंटरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हे रडणारे नवरे कुठे भेटतात?” तर एका युजरने लिहिलेय, “किती महान असेल आई जिने महिलांचा त्रास समजून घेता येईल असे चांगले संस्कार दिले” आणखी एका युजरने लिहिलेय, “खरंच सलाम त्या आईला, इतके चांगले संस्कार दिले मुलाला” एक युजर लिहितो, “असा नवरा मिळायला नशीब लागतं” एक युजर लिहितो, “माझ्या डिलिव्हरीच्या वेळी सुद्धा माझा नवरा असाच रडला होता” अनेक युजर्सनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. काही युजर्सनी हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of husband cried by seeing pain of wife while delivering child emotional video goes viral ndj