Woman And Childs Perfect Landing On Bus Video Viral : सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात जे आपल्याला आश्चर्यचकीत करतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्तीने फ्लाइट मागे टाकेल अशी लॅडिंग केली आहे. हो, व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती पुढे एका चिमुकल्याला आणि मागे एका महिलेला घेऊन सायकल चालवत आहे. तो बस पकडण्याचा प्रयत्न करतो. तो खूप हुशारीने सायकल बसच्या दरवाज्यासमोर थांबवतो आणि महिला व चिमुकला सुद्धा अत्यंत हुशारीने सायकलवरून उतरून बसमध्ये बसतात. क्षणभरासाठी हा स्टंट वाटतो. हा व्हिडीओ पाहून कोणीही थक्क होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इतकी परफेक्ट लॅडिंग अमेरिकेची फ्लाइट पण करू शकत नाही

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायल होत आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी याला परफेक्ट लँडिग म्हणताहेत. काही युजर्सची या कृतीचे कौतुक करत तर काही युजर्स मजेशीर प्रतिक्रिया देत आहे. काही लोक बॉलीवूड चित्रपटातील सिनबरोबर याची तुलना करत आहे. हा व्हिडीओ प्लॅन केला असू शकतो किंवा त्यांची ती दिनचर्या असू शकते पण सर्वांना या व्हिडीओने थक्क केले आहे. हा व्हिडीओ पाहून कोणीही म्हणेल की हे फक्त भारतात होऊ शकतं.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

https://twitter.com/profsaritasidh/status/1903719589856649359

हा व्हायरल व्हिडीओ ‘@profsaritasidh.’ या एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “अमेरिकन फ्लाइट सुद्धा अशी लॅडिंग करू शकणार नाही. असे पायलट फक्त भारतात आहे” हा व्हिडीओ दोन दिवसात 9 लाख ७७ हजार लोकांनी पाहिला आहे.

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खरंय आपल्या भारतीय पायलटच्या कौशल्याला कोणतीही तोड नाही. जय हिंद” तर एका युजरने लिहिलेय, “भारतात टॅलेंटची कमी नाही. खूप छान लॅडिंग केली आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “पत्नी माहेरी जात असेल तर सर्वकाही शक्य आहे” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video of woman and childs perfect landing on bus video goes viral amazing talent in india ndj