Viral Video: सोशल मीडियावर लहान-मोठ्या अपघातांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. खरं तर रस्त्यावरून चालताना किंवा गाडी चालवताना व्यक्तीची एक चूक कोणच्याही जीवासाठी घातक ठरू शकते. हे सर्व माहीत असूनही अनेकदा लोक रस्त्याच्या नियमांकडे दुर्लक्ष करतात. या अपघातांमध्ये अनेकदा गाडीचालकाची चूक असते तर कधी रस्त्यावरून चालणाऱ्या व्यक्तीची चूक असते. परंतु, सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात चक्क एका घरामध्ये गाडी घुसल्याचे दिसत आहे.

कोणतं संकट कुठे येईल हे कोणीही सांगू शकत नाही. असंच एक संकट या व्हिडीओतील लहान मुलीवर आलं होतं. परंतु, तिच्या मोठ्या बहिणीने चपळतेने या संकटातून तिच्या लहान बहिणीला वाचवले. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अचानक एक कार सुसाट वेगाने घराची काच तोडून आत येते, यावेळी एक चिमुकली गाडीपासून काही अंतरावर उभी असते. गाडी काही सेकंदात तिच्या अंगावरून जाणार इतक्यात तिची मोठी बहीण तिला तिथून उचलून बाहेर उभी राहते. अशाप्रकारे हा अपघात टळतो. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @mychinatrip या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत सहा मिलियनहून अधिक व्ह्युज मिळाल्या आहेत. तसेच यावर एक लाखाहून अधिक लाइक्सदेखील मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “बहीण देवदूत झाली.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “नशीब त्या बाळाचं”, तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “खूप भयानक व्हिडीओ.”