या महिलेला महाकाय अजगराने गुंडाळलं, VIRAL VIDEO पाहून लोक घाबरले! | viral video horrifying woman carries huge python on shoulder leaves netizens terrified prp 93 | Loksatta

या महिलेला महाकाय अजगराने गुंडाळलं, VIRAL VIDEO पाहून लोक घाबरले!

सापांचं नाव ऐकताच माणसाच्या डोक्यापासून पायापर्यंत सारेच जण थरथर कापतात. महिला आरामात अजगराशी खेळताना दिसत आहे.

या महिलेला महाकाय अजगराने गुंडाळलं, VIRAL VIDEO पाहून लोक घाबरले!
(Photo: Instagram/ thereptilezoo)

Woman Playing With Python : सापांचं नाव ऐकताच माणसाच्या डोक्यापासून पायापर्यंत सारेच जण थरथर कापतात. एखादा छोटासा सापही समोर आला की भीतीपोटी माणसाची अवस्था बिकट होते, अशा परिस्थितीत एखाद्या महाकाय अजगराशी आरामात खेळताना दिसले तर थक्क व्हाल. सापाचे हे एक महाकाय रूप आहे, जो त्याच्या विषाने नव्हे तर समोरच्याला गुंडाळून इतक्या वेदनादायक मृत्यू देतो की त्याच्या विचारानेच कुणीही हादरून जाईल.

जगात एकापेक्षा एक साप आहेत, त्यापैकी काही धोकादायक आणि विषारी आहेत, परंतु अजगराचे नाव एक वेगळीच भीती भरून काढण्यासाठी पुरेसे आहे. सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा एक अतिशय धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला आरामात अजगराशी खेळताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर कोणीही थक्क होईल. या अजगराचा मूड थोडा जरी बिघडला तरी महिलेचं काही खरं नाही.
या व्हिडीओमध्ये एक महिला एका महाकाय अजगरासह दिसत आहे. अजगर किमान १०-१२ फूट लांब आणि खूप वजनदार दिसतोय. हिरव्या रंगाच्या अजगराला खांद्यावर घेऊन अगदी आरामात फिरताना दिसतेय. या महिलेच्या अंगावर अजगर रेंगाळताना पाहून तुमचा थरकाप उडेल. पण महिला मात्र अजिबात घाबरत नाही. एखाद्या पाळीव अजगरसारखाच हा अजगर महिलच्या अंगावर खेळताना दिसतोय. तरी प्राण्याचा मूड कधी बिघडतो, हे सांगता येत नाही.

आणखी वाचा : बंगळुरू विमानतळावर प्रवाश्यांनी गरब्यावर ठेका धरला, हा VIRAL VIDEO पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर तरूणांनी केला गरबा डान्स; आनंद महिंद्रा म्हणाले, “गुजरातमधून माझा विरोध…

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर thereptilezoo नावाच्या आयडीने शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ केवळ काही सेकंदांचा असून तो आतापर्यंत ३ लाख ८४ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओला शेकडो लोकांनी लाईक केले असून, ज्या दिवशी त्याला भूक लागली आणि जेवण मिळणार नाही, तोच त्याचे जेवण बनून जाईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. काही लोकांनी सापाच्या रंगाची प्रशंसा केली आणि महिलेला लेडी टारझन म्हटलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
Video: ७ तरुणींनी नाचत अशी उडी मारली की रस्त्यात खड्डाच पडला आणि मग.. पाहा ‘हा’ थरकाप उडवणारा क्षण

संबंधित बातम्या

अमेरिकी नोकऱ्या गमावल्याने भारतीय इंजिनीअर्सचे विवाह अडचणीत
Optical Illusions : या फोटोत तुम्हाला काय दिसलं? यावरून कळेल तुमचं व्यक्तिमत्व आणि स्वभाव
विमानतळावरच्या टीव्ही स्क्रीनवर अचानक प्ले झाला पॉर्न व्हिडीओ; नेटिझन्स म्हणतात, “त्या दिवशी अनेकांची विमानं चुकली असतील!”
Cyrus Mistry Death: सायरस मिस्त्री यांच्या अपघाताच्या काही मिनिटांपूर्वीचं सीसीटीव्ही आलं समोर, पाहा व्हिडीओ
अजगराच्या जवळ जात ‘हॅलो बेबी’ म्हणणं महिलेला पडलं भारी; पुढच्याच क्षणी हात दिसेनासा झाला अन…पाहा Viral Video

व्हिडिओ

ताज्या बातम्या
रायगडमध्ये भात लागवडक्षेत्रात घट; तांदूळ उत्पादनात मात्र वाढ, प्रति हेक्टरी अडीच टन धान्य
शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ ; प्रस्ताव मंजुरीसाठी वित्त विभागाकडे
अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे क्रिकेट सल्लागार समितीवर
महानगर क्षेत्रात लवकरच आपला दवाखाना ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही
FIFA World Cup 2022: टय़ुनिशियाविरुद्ध अपात्र गोलबाबत फ्रान्स फुटबॉल महासंघाची तक्रार