विद्यार्थ्यांना गणितासारखा विषय हा कठीण वाटतो. अशावेळी शिक्षकांकडून विविध शक्कल लढवून शिकविण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. कारण विद्यार्थ्यांना जर शाळेत प्रश्न विचारला की, तुम्हाला कोणत्या विषयाची सगळ्यात जास्त भीती वाटते तर विद्यार्थी गणिताचा विषय अवघड जात असल्याचेच सांगतात. ही अवस्था फक्त भारतातल्या विद्यार्थ्यांची नव्हे तर विदेशातल्या विद्यार्थ्यांची सुद्धा आहे. विदेशातल्या मुलांना या भारतीय शिक्षकाची गणिताचा अभ्यास करण्याची सोपी पद्धत फारच आवडली आहे. या भारतीय शिक्षकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गणिताचा वर्ग असलेला दिसत आहे. गणित विषयाच्या त्रिकोणमिती या विद्यार्थ्यांना हे शिक्षक शिकवताना दिसत आहे. विद्यार्थ्यांना गणितासारखा विषय हा आकृतींमुळे कठीण वाटतो. अशावेळी या आकृत्यांसाठी विविध शक्कल लढवून शिकविण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होतो. गणितासारखा कठीण विषय सोपा करण्यासाठी या विषयाचा पाया मजबूत करणे गरजेचे आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे पाढे, समीकरणे, वर्ग यासारखे पाठांतर करून घेणे महत्त्वाचे असते, यावर गणिताचे अनेक शिक्षक भर देतात. गणिताचा पाया असलेले समीकरण पाठ करण्यासाठी या व्हिडीओमधल्या शिक्षकांनी जी शक्कल लढवली ती पाहून तुम्हीही म्हणाल, गणितासाठी आम्हाला हाच शिक्षक हवा.
खरं तर या व्हिडीओमधील भारतीय शिक्षक हे एका म्यूजिकल फॉरमॅटमध्ये विद्यार्थ्यांना गणित विषय शिकवताना दिसून येत आहेत. यावेळी गणिताचा तास सुरू असताना हे विद्यार्थी पेंगाळलेले न दिसता याउलट उत्साही दिसून येत आहेत. या व्हिडीओमधल्या भारतीय शिक्षकाचं नाव बाला रेड्डी असं आहे. बाला रेडी यांची ही शिकवण्याची पद्धत विदेशातल्या विद्यार्थ्यांना बरीच आवडली आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : काचेसारखा चकाकणारा ऑक्टोपस कधी पाहिलाय का? पाहून लोक आश्चर्यचकित झाले
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : याला म्हणतात टीम वर्क! हा VIRAL VIDEO एकीचे बळ दाखवतो…
हा व्हिडीओ @AK_Inspire नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे आवर्जून सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. हा व्हिडीओ बघता बघता सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. या व्हिडीओला आतापर्यंत १ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. तर २६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर भरभरून कमेंट करत भारतीय शिक्षकाचं कौतूक करताना दिसत आहेत. या शिक्षकाची शिकवण्याची ही स्टाईल लोकांना फारच आवडली आहे.